Free Ration Scheme : 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने सत्ता स्थापित केल्यापासून अनेक मोठमोठे निर्णय घेतले आहेत. देशभरातील शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, असंघटित कामगारांसाठी, सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध निर्णय शासन स्तरावर घेतले जात आहेत. 2014 पासून आतापर्यंत विविध योजना देशभरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत.
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देखील केंद्रातील मोदी सरकारने विविध कौतुकास्पद निर्णय घेतले आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी देशातील महिलांसाठी घरगुती गॅस सिलेंडरचे दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना घरगुती गॅस सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्तात देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. शिवाय याच लाभार्थ्यांसाठी गॅस सिलेंडरच्या सबसिडीमध्ये शंभर रुपयांची वाढ करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे.
एकंदरीत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांना खुश करण्यासाठी सरकारकडून विविध निर्णय घेतले जात आहेत. अशातच आता केंद्रातील मोदी सरकारने फ्री रेशनिंग योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. वास्तविक, कोरोना काळात मोदी सरकारने फ्री रेशनची योजना सुरू केली आहे.
या अंतर्गत देशातील रेशन कार्ड धारकांना मोफत रेशन पुरविले जात आहे. दरम्यान हे मोफत रेशन आता पुढील पाच वर्षांसाठी दिले जाणार आहे. काल अर्थातच 4 नोवेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे.
म्हणजेच कोरोना काळात सुरू करण्यात आलेली मोफत रेशनिंगची योजना आणखी पाच वर्षांसाठी सुरू राहणार आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या या निर्णयाचा देशभरातील 80 कोटी लोकांना थेट फायदा मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. खरतर दिवाळीचा सण मात्र पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे.
अशातच केंद्रातील मोदी सरकारने हा निर्णय घेतला असल्याने देशातील 80 कोटी लोकांना ही एक दिवाळी भेट असल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल अर्थातच चार नोव्हेंबर रोजी छत्तीसगड येथील दुर्ग मध्ये एका सभेला संबोधित करत होते.
या जाहीर सभेतच पंतप्रधानांनी मोफत रेशन योजना पुढील पाच वर्षांसाठी वाढवण्याची मोठी घोषणा केली आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत छत्तीसगडसह पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला असल्याचे बोलले जात आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की मोफत रेशन योजना सर्वप्रथम 30 जून 2020 रोजी सुरू करण्यात आली. यानंतर या योजनेला वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. दरम्यान ही योजना 31 डिसेंबर 2023 ला संपणार होती. पण आता पुन्हा एकदा याला मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय झाला आहे.
आता मोफत रेशनिंगची ही योजना डिसेंबर 2028 पर्यंत सुरू राहणार आहे. छत्तीसगड येथील एका जाहीर सभेला मोदीत करताना नरेंद्र मोदी यांनी या योजनेला मुदतवाढ देण्याची घोषणा केली असून यावेळी पंतप्रधान महोदय यांनी सभेला आलेल्या नागरिकांना संबोधित करत तुमचे प्रेम आणि आशीर्वाद मला नेहमी पवित्र निर्णय घेण्याचे बळ देत असल्याचे म्हटले आहे.