Gold Rate : सध्या भारतात लोकसभा निवडणुकीची धामधूम आणि लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची आणि नेत्यांची लगीनघाई पाहायला मिळत आहे तर लग्नसराईचा हंगाम असल्याने देशात सोने, चांदी खरेदीसाठी सराफा बाजारात गर्दी पाहायला मिळत आहे.
लग्नाचा हंगाम पाहता आणि आगामी सणासुदीचा काळ पाहता अनेक जण सराफा बाजारात सोने खरेदीसाठी दाखल होत आहेत. दरम्यान सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे सोने पुन्हा एकदा चमकले आहे. त्याचे भाव आता गगनाला भिडले आहेत. खरेतर, काल अर्थातच 20 मार्च 2024 ला सोन्याच्या बाजारभावात नरमाई पाहायला मिळाली. आज 21 मार्चला सकाळी देखील बाजारात मोठी नरमाई होती.
त्यामुळे सोन्याच्या बाजारभावात आता आणखी घसरण होणार की काय ? असे वाटतं होते. यामुळे सोन्यात गुंतवणूक केलेल्यांची चिंता वाढलेली होती. मात्र, काल आणि आज सकाळी काही वेळ सोने नरमले पण, दुपारनंतर सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा अचानक मोठी वाढ पाहायला मिळाली.
सोन्याने आतापर्यंतचे सारे रेकॉर्ड मोडले आहेत. ज्यांनी आधीच सोन्यात गुंतवणूक केली त्यांच्यासाठी आजची ही भाव वाढ फायद्याची ठरली. मात्र जे आज सराफा बाजारात सोने खरेदीसाठी गेलेत त्यांना नवीन भाव ऐकून थोडासा धक्का बसला. हाती आलेल्या माहितीनुसार आज जागतिक बाजारात सोन्याचे भाव 2200 डॉलर प्रति औसवर पोहचलेत.
विशेष म्हणजे जागतिक बाजारातील हा भाव आतापर्यंतचा सर्वाधिक भाव आहे. याचा परिणाम म्हणून आज देशातील अनेक शहरांमधील सराफा बाजारामध्ये दहा ग्रॅम सोन्याचे भाव 67 हजार रुपयांच्या घरात पोहोचलेत.
आज वायदे बाजारात (MCX) सोन्याची किंमत 66,943 रुपये प्रति 10 ग्रॅम स्तरावर पोहचली आहे. काल, 24 कॅरेट सोने 65,689 रुपयावर होते पण, आज या मौल्यवान धातूचा भाव 66,968 रुपयांच्या घरात पोहचला आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सोन्याच्या भावात अचानक एवढी वाढ का झाली ? तर याबाबत माहिती देतांना तज्ञांनी अमेरिकेतील एका घडामोडीचा उल्लेख केला आहे. तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कोणताही बदल केला नाही.
पण, व्याजदरात लवकरच कपात होईल असे संकेत बँकेकडून यावेळी प्राप्त झालेत. याचा परिणाम म्हणून सोन्याच्या भावात अचानक उसळी पाहायला मिळाली. याचा परिणाम म्हणून सोन्यात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला आहे. पण चांदीमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली होती त्यांची आज निराशा झाली आहे.
कारण की, चांदीच्या भावात आज काहीशी नरमाई पाहायला मिळाली. MCX वर चांदी 75,915 रुपये प्रति किलोग्राम किंमतींवरून 75,775 रुपयांपर्यंत खाली घसरली असल्याची अन जागतिक बाजारात चांदी 25.63 डॉलर प्रति औसच्या जवळपास ट्रेड करत असल्याची बातमी समोर आली आहे.