FD News : एफडी अर्थातच फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या आपल्या देशात खूपच अधिक आहे. याचे कारण म्हणजे गुंतवणूकदारांना एक निश्चित आणि खात्रीशीर परतावा हवा असतो.
कष्टाने कमावलेला पैसा वाया जाऊ नये यासाठी अनेक जण सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य देतात. जेव्हा-जेव्हा सुरक्षित गुंतवणुकीचा विषय निघतो तेव्हा एफडीला प्राधान्य मिळते. हेच कारण आहे की गेल्या अनेक वर्षांपासून एफडी मध्ये पैसा गुंतवला जात आहे.
विशेष बाब अशी की आता बँकांनी एफडीवर देखील चांगले व्याज ऑफर करण्यास सुरवात केली आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने गेल्या काही महिन्यांपूर्वी रेपो रेट मध्ये चांगली वाढ केली होती. याचा परिणाम म्हणून एफडीचे व्याजदर वाढले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून आरबीआयने रेपो रेट मध्ये कोणताच बदल केलेला नाही. मात्र तरीही बँकांच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडी व्याजदरात वाढ केली जात आहे. या चालू मे महिन्यात देखील देशातील काही स्मॉल फायनान्स बँकांनी आपल्या व्याजदरात सुधारणा केली आहे.
त्यामुळे गुंतवणूकदारांना एफडी मधून देखील चांगला परतावा मिळू लागला आहे. या चालू मे महिन्यात उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने आपल्या FD व्याजदरात सुधारणा केली असून या बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आता FD वर 9% पेक्षा अधिकचे व्याज दिले जात आहे.
आता आपण उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने एफडी व्याजदर रिवाईज केल्यानंतर बँकेच्या माध्यमातून एफडीवर किती व्याजदर दिले जात आहे, कोणत्या कालावधीच्या एफडीवर सर्वाधिक व्याज दर मिळत आहेत ? याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक मुदत ठेवीसाठी किती व्याज देत आहे?
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, बँकेने नुकत्याच काही दिवसांपूर्वी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेसाठी त्यांच्या FD व्याजदरांमध्ये सुधारणा केली आहे. हे सुधारित दर 1 मे 2024 पासून लागू झालेले आहेत.
व्याजदर सुधारित झाल्यानंतर आता या बँकेच्या माध्यमातून FD वर सामान्य ग्राहकांना 4% ते 8.50% या दरम्यान व्याज दिले जात आहे. दुसरीकडे सीनियर सिटीजन ग्राहकांना 4.60% ते 9.10% यादरम्यान व्याज दिले जात आहे.
बँक दोन वर्ष ते तीन वर्ष कालावधीच्या एफडी साठी सर्वाधिक व्याज देत आहे. या कालावधीच्या एफडी साठी सामान्य ग्राहकांना 8.50% आणि ज्येष्ठ नागरिकांना 9.10% एवढे व्याज मिळत आहे.