सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आता शेतकऱ्यांनाही मिळणार पेन्शन ! ‘या’ योजनेमुळे शेतकऱ्यांचे म्हातारपण जाणार आनंदात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Scheme : शासनाच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या सवलती दिल्या जात आहेत. यामुळे अनेक जण सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहतात. सरकारी नोकरीमध्ये नोकरीची हमी असते शिवाय सरकारी कर्मचाऱ्यांना चांगला पगार मिळतो.

त्यांना महागाई भत्ता घर, भाडे भत्ता असे वेगवेगळे प्रकारचे भत्ते मिळतात. याशिवाय सेवानिवृत्तीनंतर त्यांना पेन्शनही मिळते. हेच कारण आहे की गव्हर्मेंट जॉबचा हेवा भल्याभल्यांना वाटतो. दरम्यान आता सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे शेतकऱ्यांना देखील पेन्शन मिळणार आहे.

यामुळे शेतकऱ्यांचे देखील म्हातारपण आनंदात जाणार आहे. यासाठी सरकारने एक विशेष योजना सुरू केली आहे. खरेतर केंद्रातील सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी यासाठी पीएम किसान मानधन योजना नामक एक विशेष योजना देखील सुरू करण्यात आली आहे.

याअंतर्गत शेतकऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा 3000 रुपये पेन्शन म्हणून मिळणार आहे. मात्र यासाठी सुरुवातीला शेतकऱ्यांना काही रक्कम गुंतवावी लागते. जे शेतकरी बांधव पीएम किसान मानधन योजनेत नाव नोंदणी करतात आणि या योजनेत ठराविक रक्कम गुंतवतात त्यांना वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर पेन्शनचा लाभ दिला जातो.

छोट्या व अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून मासिक तीन हजार रुपयांची पेन्शन दिली जाते. यासाठी शेतकऱ्यांना नाव नोंदणी केल्यानंतर प्रत्येक महिन्याला 55 ते 200 रुपयांपर्यंतची प्रीमियमची रक्कम भरावी लागते. या योजनेत नाव नोंदणी करण्यासाठी 18 ते 40 वर्ष वयोगटातील शेतकरी पात्र ठरतात.

जे शेतकरी बांधव अठराव्या वर्षी या योजनेत नाव नोंदणी करतात त्यांना प्रत्येक महिन्याला 55 रुपये गुंतवणूक करावी लागते. मात्र जे शेतकरी बांधव चाळीसाव्या वर्षी या योजनेत नाव नोंदणी करतात त्यांना 200 रुपये प्रीमियम भरावा लागतो.

60 वर्षापर्यंत ही रक्कम भरावी लागते. सदर नाव नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे 60 वर्ष पूर्ण झालेत की मग या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन मिळते म्हणजेच वार्षिक 36 हजार रुपयांची पेन्शन दिली जाते. तथापि, शेतकऱ्यांसाठी सुरू झालेली ही योजना एक ऐच्छिक योजना आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना नाव नोंदणी करणे आणि प्रीमियम भरणे आवश्यक असते.

Leave a Comment