महाराष्ट्रातील ८५.६६ लाख लाभार्थी शेतकर्‍यांना १,८६६.४० कोटी रुपयांचा तर देशातील ८.५ कोटी लाभार्थींच्या खात्यावर या हप्त्याची रक्‍कम जमा होणार आहे. सकाळी ११ वाजता राजस्थानमधील सिकर येथे केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या वतीने आयोजित “पीएम किसान संमेलनात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते *एका क्लिकवर’ हा निधी वितरित करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत दिली.

गुरुवारी १४ व्या हप्त्यापोटी साडेआठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर १८ हजार कोटी रुपये निधी वितरित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या किसान संमेलनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री मोदी हे देशातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

Advertisement

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने (पीएमकिसान ) अंतर्गत देय असलेल्या चौदाव्या हप्त्याचा (एप्रिल २०२३ ते जुले २०२३) लाभ देशातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाईल. खरीप हंगामात बियाणे, खते, औषधे यांसारख्या कृषी निविष्ठा खरेदीसाठी ही रक्‍कम निश्‍चितच उपयुक्‍त ठरेल आणि कृषी उत्पादन वाढीला चालनाही मिळेल.

फेब्रुवारी २०१९ मध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू झाल्यापासून, ११०.५३ लाख लाभार्थी शेतकऱ्यांना एकूण २३,७३१.८१ कोटी लाभ हस्तांतरित झाला आहे. या सोहळ्याला, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय रसायन व खते आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया उपस्थित राहणार आहेत.

Advertisement

सुमारे ८६ लाख पात्र लाभार्थ्यांना होणार फायदा
महाराष्ट्र राज्यातील एकूण ८५.६६ लाख पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १ एप्रिल २०२३ ते ३१ जुलै २०२३ या कालावधीसाठी सीकर येथे होणाऱ्या समारंभात अंदाजे १,८६६. ४० कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरित केला जाईल

राज्यातील ८८.९२ लाख लाभार्थ्यांची बँक खाती आधारशी जोडून लाभाच्या रकमेसाठी नोंदणी करण्यात आली आहेत. उर्वरित सर्व लाभार्थ्यांनी त्याचे बँक खाते आधारशी लिंक करण्यासाठी संबंधित बँकेला भेट द्यावी आणि केंद्र सरकारच्या विनंतीनुसार पंतप्रधान किसान योजनेचे लाभ मिळवण्यासाठी आधार लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बँकेकडे आवश्यक अर्ज सादर करण्याचे सूचित केले आहे.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *