MSRTC News :- महाराष्ट्रात एसटी महामंडळाने गेल्यावर्षीपासून अमृत योजनेद्वारे 75 वर्षांवरील नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास करण्याची मूभा दिली आहे. त्यानंतर एसटीने अलिकडेच महिलांना एसटीच्या सर्व श्रेणीच्या बसेसमधून महिलांना अर्ध्या तिकीटात प्रवासाची सवलत जाहीर केली आहे.

ह्या दोन्ही योजनांचा नागरिक आणि महिलांना प्रचंड फायदा झाला आहे. तसेच महामंडळाचे प्रवाशांमध्येही वाढ झाली आहे. एसटी महामंडळ विविध 29 समाजघटकांना प्रवासात सवलत देत असते.आता मात्र नवे परिपत्रक काढण्यात आले आहे.

Advertisement

आजार असलेल्या व्यक्तींचा मोफत प्रवास बंद

सिकलसेल, एचआयव्हीबाधित, हिमोफेलिवाग्रस्त आणि डायलिसिसच्या रुग्णांना एसटी बसप्रवास मोफत आहे. मात्र एसटी महामंडळाने आता नवे परिपत्रक काढत संबंधित रुग्णांना केवळ साध्या गाडीतच मोफत प्रवास करण्याची मुभा दिली आहे.

Advertisement

याआधीच्या परिपत्रकात असलेला निमआराम आणि आराम गाडीतील मोफत प्रवासाबाबतचा उल्लेख बगळण्यात आल्याचे म्हटले आहे. यावरून या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना एसटीच्या निमआराम आणि आराम बसने प्रवास करताना पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे आधीच वैद्यकीय खर्चाने त्रस्त असलेल्या रुग्णांची परवड होणार आहे.

राज्याच्या कानाकोपऱ्यात एसटीच्या जवळपास १४ हजार बस धावतात. दररोज ५५ लाख प्रवासी प्रवास करतात. या बसमध्ये सिकलसेल, एचआयव्हीबाधित, हिमोफे लियाग्रस्त आणि डायलिसिसच्या रुग्णांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

Advertisement

महामंडळाने त्याबाबत २०१८ मध्ये परिपत्रकही काढले होते. मात्र अलीकडेच एसटीने वाहतूक महाव्यवस्थापकांच्या सहीने एक परिपत्रक काढले आहे. त्यामध्ये एसटीच्या साध्या बसने संबंधित रुग्णांना मोफत प्रवासाची सुविधा आहे. त्यामुळे २०१८ च्या परिपत्रकात निमआराम आणि आराम बसमधील सवलतीबाबत असलेला उल्लेख वगळण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

म्हणजे २०१८ च्या परिपत्रकानुसार ज्या रुग्णांनी एसटीच्या सर्व बसने मोफत प्रवास केला असेल त्यांना यापुढे मात्र निमआराम आणि आराम बसच्या प्रवासासाठी पैसे मोजावे लागणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. त्यामुळे आपल्या आजारांवरील खर्चाने आधीच मेटाकुटीला आलेल्या सिकलसेल, एचआयव्हीबाधित, हि मोफे लियाग्रस्त आणि डायलिसिसच्या रुग्णांच्या खिशाला आणखी कात्री लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Advertisement

साध्या बसमध्येच मोफत प्रवासाची सोय

आधीपासूनच संबंधित रुग्णांना केवळ साध्या बसमध्येच मोफत प्रवासाची सोय असून निमआराम, आराम बसमध्ये सवलत नाही. – शिवाजी जगताप, वाहतूक महाव्यवस्थापक, एसटी महामंडळ

Advertisement

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *