Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. खरंतर, देशभरात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या मोठी उल्लेखनीय आहे. यात पुरुष कर्मचाऱ्यांची संख्या ही अधिक आहे. अशातच, देशभरातील केंद्रीय पुरुष कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे आता महिला सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर पुरुष कर्मचाऱ्यांना देखील केंद्राच्या एका मोठ्या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. याबाबतचा निर्णय मोदी सरकारने नुकताच घेतला आहे. दरम्यान, आज आपण महिला कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर पुरुष कर्मचाऱ्यांना कोणत्या योजनेचा लाभ मिळणार आहे, याबाबतची माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या योजनेचा लाभ मिळणार ?
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, आता पुरुष केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना महिला कर्मचाऱ्यांप्रमाणे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
या योजनेअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारी रुग्णालयांमध्ये स्वस्तात उपचार मिळतात. यासोबतच विशेष उपचार, कृत्रिम अवयवांसाठी खर्च, आपत्कालीन परिस्थितीत सरकारी आणि खासगी दवाखान्यातील उपचाराचा खर्च, मोफत आरोग्य तपासणी अशा सुविधांचा लाभही मिळतो. आतापर्यंत या योजनेअंतर्गत महिला कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या आई-वडिलांना आणि सासू-सासर्यांना लाभ मिळत होता.
मात्र आता पुरुष कर्मचाऱ्यांना देखील महिला कर्मचाऱ्यांप्रमाणे या योजनेचा लाभ मिळणार असून त्यांच्या आई-वडिलांना आणि सासू-सासर्यांना देखील या योजनेअंतर्गत सरकारी रुग्णालयांमध्ये स्वस्तात उपचार मिळणार आहेत. मात्र यासाठी संबंधित नातेवाईक त्या सरकारी कर्मचाऱ्यांवर पूर्णपणे अवलंबून असायला हवेत.
कोणाला मिळणार लाभ ?
या योजनेचा लाभ आता केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. याआधी केंद्रीय महिला कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र, आता पुरुष कर्मचाऱ्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त या योजनेचा लाभ देशातील आजी-माजी खासदार, माजी राज्यपाल आणि उपराज्यपाल, स्वातंत्र्यसैनिक, माजी राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय आणि हायकोर्टाचे आजी-माजी न्यायाधीश, केंद्र सरकारची मान्यता मिळालेले पत्रकार, दिल्ली पोलीस कर्मचारी, रेल्वे बोर्डाचे कर्मचारी आणि पोस्ट ऑफिसच्या कर्मचाऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळत आहे.