Mhada News : अखेर म्हाडाने घेतला मोठा निर्णय ! ‘या’ घरांची विक्री होत नाही तोपर्यंत…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mhada News : मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रात आपले स्वतःचे हक्काचे घर असावे. आपल्या छोट्याशा आशियानात आपण मनमुराद जगाव असं स्वप्न उराशी बाळगून आजही मुंबईमध्ये अनेकजण मन मारून जगत आहेत. मात्र दिवसेंदिवस सदनिकांच्या वाढत असलेल्या किमती पाहता अनेकांना आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करता येत नाहीये.

अशा परिस्थितीत आपल्या हक्काच्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी अनेकजण म्हाडा आणि सिडकोकडून उपलब्ध होणारी परवडणाऱ्या दरातील घरांची खरेदी करतात. मुंबई मंडळ आणि कोकण मंडळाने आतापर्यंत हजारो लोकांची घराची स्वप्न पूर्ण केली आहेत.

दरम्यान कोकण मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाने विरार बोळींज येथील गृह प्रकल्पासंदर्भात एक महत्त्वाचा आणि अतिशय कामाचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विरार बोळिंज येथील गृहप्रकल्पातील घरे विक्री होत नसल्याने आता ही घरे जोपर्यंत विक्री होत नाही तोपर्यंत अर्ज विक्री स्वीकृती आणि वितरण प्रक्रिया सुरू ठेवण्याचा मोठा निर्णय मंडळाकडून घेण्यात आला आहे.

खरंतर या गृहप्रकल्पाअंतर्गत दहा हजार घरे बांधली जात आहेत. यापैकी 9,000 घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. यातील 6,000 घरांची विक्री देखील झाली आहे. मात्र दोन हजाराहून अधिक घरांची अजूनही विक्री झालेली नाही. या विक्री न झालेल्या घरांसाठी दोन ते तीनदा सोडत काढण्यात आली आहे. मात्र ही घरे विक्री होत नाहीयेत.

यामुळे मंडळाची डोकेदुखी वाढत आहे. दरम्यान मे 2023 मध्ये या गृह प्रकल्पातील विक्री न झालेल्या जवळपास 2048 घरांचा प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजनेत समावेश करण्यात आला. असे असतानाही केवळ शंभर ते दीडशे घरांची विक्री झाली.

यामुळे आता सप्टेंबरमधील सोडतीत या प्रकल्पातील विक्री न झालेली 2122 घरांचा प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजनेत समावेश केला जाणार आहे. तसेच ज्या घरांची या सोडतीत विक्री होणार नाही त्यासाठी अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरूच राहणार आहे. निश्चितच, मंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे या गृहप्रकल्पातील विक्री न झालेल्या घरांची विक्री होईल असा आशावाद आता व्यक्त होऊ लागला आहे.

Leave a Comment