Maharashtra Government Employee : सध्या देशात सणासुदीचा हंगाम सुरू आहे. यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दिवाळीचा सण मात्र सहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. परिणामी बाजारपेठांमध्ये मोठी तेजी आली आहे.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र आनंद आणि उत्साह बघायला मिळतोय. दरम्यान, या आनंददायी वातावरणात महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. वास्तविक, पुढील वर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आणि महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पाहता राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य कर्मचाऱ्यांना कृषी करण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला जाणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासनाकडून राज्यातील 17 लाख राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयाबाबत मोठा निर्णय घेतला जाणार आहे. राज्य कर्मचाऱ्यांचे रिटायरमेंट एज अर्थात सेवानिवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढवले जाणार असे वृत्त समोर आले आहे.
खरंतर राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. विविध कर्मचारी संघटनांनी यासाठी शासनाने दरबारी निवेदने दिली आहेत. शासनात कार्यरत असलेल्या आणि विपक्षात असलेल्या लोकांनी देखील याबाबत वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना तसेच देशातील इतरही घटक राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे 60 वर्षे सेवा देण्याची मुभा उपलब्ध आहे तसेच मुभा राज्यातील कर्मचाऱ्यांना देखील मिळावी. राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे एवढे आहे. मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांचेही सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे व्हावे अशी मागणी आहे.
दरम्यान राज्य कर्मचाऱ्यांची ही मागणी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी पूर्ण होणारा असा दावा केला जात आहे. निवडणुकीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांना कृषी करण्यासाठी वर्तमान शिंदे-फडणवीस-पवार सरकार याबाबत सकारात्मक निर्णय घेणार असे सांगितले जात आहे.
यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय खरंच 60 वर्षे होते का याकडे कर्मचाऱ्यांचे विशेष लक्ष लागून राहणार आहे. विशेष म्हणजे याबाबतचा निर्णय निवडणुकांपूर्वी घेतला जातो का हे देखील पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.