State Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. जर तुम्हीही राज्य शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या मित्र परिवारात किंवा कुटुंबात कोणी शासकीय सेवा बजावत असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की, येत्या काही दिवसात राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचे वेतन मिळणार आहे. म्हणजेच ऑगस्ट महिन्यात कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार आहे. या वेतनासोबत कर्मचाऱ्यांना तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत. अशा परिस्थितीत आज आपण राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याच्या पगारासोबत कोणते आर्थिक लाभ मिळणार आहेत याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
जस की आपणांस ठाऊकच आहे की, राज्य शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर राज्यातील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात चार टक्के वाढ केली आहे. अर्थातच राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्के एवढा झाला आहे. आधी हा भत्ता 38 टक्के एवढा होता. पण आता यात चार टक्के वाढ करण्यात आली आहे.
ही महागाई भत्ता वाढ राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली आहे. खरंतर याचा रोखीने लाभ जून महिन्याच्या वेतनासोबतच दिला जाणार होता. मात्र, हा शासन निर्णय निर्गमित झाला तेव्हा अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन बिल तयार करण्यात आले होते. यामुळे राज्यातील अनेक कर्मचाऱ्यांना जून महिन्याच्या वेतनासोबत हा लाभ देण्यात आला नाही.
मात्र आता ज्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा रोखीने लाभ मिळालेला नाही त्यांना हा लाभ जुलै महिन्याच्या वेतना सोबत दिला जाणार आहे. यासोबतच, या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील मिळणार आहे. म्हणजेच एक जानेवारीपासूनची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील संबंधित कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. याशिवाय, जे कर्मचारी कामाच्या ठिकाणी वास्तव्य करत नाहीत त्यांचा घर भाडे भत्ता रोखण्यात आला होता.
मात्र आता उच्च न्यायालयाने अशा कर्मचाऱ्यांना घर भाडे भत्ता पासून वंचित ठेवले जाऊ शकत नाही असा महत्त्वाचा निर्णय दिला असल्याने कर्मचाऱ्यांना घर भाडे भत्ता देखील जुलै महिन्याच्या वेतना सोबत मिळणार आहे. एकंदरीत महागाई भत्ता वाढीचा रोखीने लाभ, महागाई भत्ता फरकाची रक्कम आणि घरभाडे भत्ता असे तीन आर्थिक लाभं जुलै महिन्याच्या वेतना सोबत राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत.