Google Pay Phonepay UPI Pin : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये रोकड व्यवहारावर मोठे निर्बंध आले आहेत. आता रोकड व्यवहारांऐवजी डिजिटल पद्धतीने किंवा ऑनलाईन व्यवहार करण्याला प्राधान्य दाखवले जात आहे. यासाठी यूपीआय पेमेंट एप्लीकेशन चा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. परिणामी भारतात कॅशलेस व्यवहाराला चालना मिळाली आहे.
कॅशलेस व्यवहारांची संख्या गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढले असून यासाठी सरकारचे प्रयत्न निश्चितच वाखाणण्याजोगे आहेत. भारतात यूपीआयने पेमेंट करण्यासाठी गुगल पे आणि फोन पे यांसारख्या डिजिटल पेमेंट एप्लीकेशनचा सर्वाधिक उपयोग केला जात आहे.
दरम्यान जर तुम्हीही गुगल पे आणि फोन पे वापरत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे. तुम्ही PhonePe आणि GooglePe द्वारे UPI पेमेंट करत असाल तर तुम्हाला तुमचा UPI पिन पासवर्ड बदलावा लागणार आहे.
खरेतर, UPI पिन चेंज करण्यासाठी फोन पे किंवा गुगल पे च्या माध्यमातून सांगितले गेलेले नाही. पण, फोन पे आणि गुगल पे वापरकर्ते एकच पिन पासवर्ड दीर्घकाळ वापरत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे मात्र पिन पासवर्ड चोरीचा धोका वाढतो.
यामुळे फोन पे आणि गुगल पे वापरणाऱ्यांना त्यांचा पिन पासवर्ड बदलण्याचा सल्ला दिला जात आहे. दरम्यान आता आपण फोनपे आणि गुगल पे चा UPI पिन कसा बदलायचा याबाबत सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Google Pay चा पिन कसा बदलायचा बरं?
यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगल पे हे ॲप्लिकेशन उघडायचे आहे. एप्लीकेशनवर गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रोफाईलवर जायचे आहे.
त्यानंतर बँक खात्यावर टॅप करा. ज्या बँकेचा तुम्हाला यूपीआय पिन बदलायचा आहे ती बँक निवडा.
यानंतर, एक नवीन पेज उघडेल, जिथे वरच्या उजव्या कोपर्यात तीन ठिपके दिसतील, ज्यावर टॅप करावे लागणार आहे.
त्यानंतर तुमचा UPI पिन बदला हा पर्याय तुम्हाला दिसेल.
यानंतर तुम्हाला तुमचा सध्याचा पिन टाकावा लागेल.
त्यानंतर तुम्हाला नवीन पिन टाकण्याचा पर्याय मिळेल. यानंतर नवीन पिन पुन्हा टाकून पुष्टी करावी लागेल.
अशा प्रकारे तुम्ही तुमच्या Google Pay चा पिन बदलू शकता.
फोनपेचा पिन कसा बदलायचा बरं?
यासाठी तुम्हाला सर्व्यातआधी PhonePe ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे. नंतर मग तुम्हाला तुमच्या प्रोफाईल मध्ये जायचे असेल.
मग येथून Payment Methods Section च्या खाली असणारी तुमची बँक तुम्हाला निवडायची. ज्या बँकेचा पिन तुम्हाला बदलायची आहे ती बँक निवडा.
मग UPI पिन रीसेट करा पर्यायावर क्लिक करा.
निवडलेल्या बँक खात्याशी लिंक केलेल्या तुमच्या डेबिट/एटीएम कार्डचे तपशील एंटर केल्यावर, तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एसएमएसद्वारे 6 अंकी OTP पाठवला जाईल. मग हा OTP दिलेल्या रकान्यात टाकायचा आहे.
मग तुम्हाला तुमचा 4 अंकी एटीएम पिन टाकावा लागणार आहे.
नवीन UPI पिन सेट करण्यासाठी 4 किंवा 6 अंकी UPI पिन एंटर करा.
यानंतर कन्फर्म बटणावर टॅप करावे लागणार आहे. अशा तऱ्हेने तुमचा नवीन पिन सेट होणार आहे.