हाताची बोटे सुद्धा सांगतात रहस्य ! तुमची करंगळी सांगते तुमचा स्वभाव कसा आहे ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Samudrik Shastra Personality Test : ज्योतिष शास्त्राप्रमाणे समुद्र शास्त्राला देखील अनेक लोक मानतात. समुद्र शास्त्रावर विश्वास ठेवणाऱ्यां लोकांची संख्या खूपच अधिक आहे. खरे तर सामुद्रिक शास्त्र हा ज्योतिष शास्त्राचा एक अविभाज्य भाग आहे. व्यक्तीच्या शरीरावरून त्याचे स्वभाव गुण ओळखता येऊ शकतात, सामुद्रिक शास्त्रात असे म्हटले गेले आहे.

खरेतर, निसर्गतः प्रत्येक मनुष्याचे शरीर हे वेगवेगळे आहे. प्रत्येक व्यक्तीचा चेहरा, शरीरयष्टी ही भिन्न असल्याचे आपल्याला पाहायला मिळेल. कोणाचा त्वचेचा रंग सावळा आहे तर कोणाचा उजट. कोणाचा चेहरा लांब आहे तर कोणाचा गोल.

कोणाचे डोळे काळे आहेत तर कोणाचे गारे आहेत. पण, मनुष्याच्या या शारीरिक बनावटीवरून त्याचा स्वभाव व चारित्र्याबद्दल जाणून घेणे शक्य असल्याचा दावा केला जातो. या विद्येलाच सामुद्रिक शास्त्र असे म्हटले जाते.

दरम्यान या सामुद्रिक शास्त्रात हाताच्या बोटांवरून देखील व्यक्तीचा स्वभाव ओळखला जाऊ शकतो असं सांगितलं गेल आहे. आज आपण हाताच्या बोटांवरून व्यक्तीचा स्वभाव कसा आहे याबाबत समुद्रिक शास्त्रात काय वर्णन करण्यात आले आहे याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

जर एखाद्या व्यक्तीची करंगळी ही अनामिकेच्या सांध्याच्या खाली असली तर तो एक आशावादी व्यक्ती असतो. हा व्यक्ती खूप उदार असतो. उदार व्यक्तिमत्व तर असतेच शिवाय, एखाद्याकडून वारंवार चूक झाली तरी अशी व्यक्ती त्याला माफ करत असते. म्हणजे अशी व्यक्ती दयावान असते. पण, अनेक वेळा लोक त्यांच्या उदार व्यक्तिमत्वाचा चुकीचा फायदा घेतात असे सामुद्रिक शास्त्रात म्हटले गेले आहे.

काही लोकांचा अनामिका आणि करंगळी यांचा सांधा सारखाच असतो. या प्रकारचे लोक अंतर्मुख व्यक्तिमत्त्व असतात. त्यांना लोकांसोबत हँग आउट करायला खूप वेळ लागतो. ते प्रामाणिक लोक आहेत आणि त्यांना अप्रामाणिक लोक अजिबात आवडत नाहीत.

ते त्यांच्या कुटुंबावर आणि प्रियजनांवर खूप प्रेम करतात आणि त्यांच्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. काही लोकांची करंगळी इतर बोटांच्या सांध्याच्या वर पोहोचते. अशा प्रकारचे लोक निष्ठावंत असतात. ते खूप संवेदनशील असतात. हे लोक इतर लोकांच्या भावनांचा आदर कसा करावा हे शिकवतात.

त्यांना ईतरांचा आदर कसा केला गेला पाहिजे याची चांगलीच माहिती असते. मात्र, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला दोन बाजू आहेत. ते लोकांना जे दाखवतात त्याच्या अगदी उलट असते. म्हणजे त्यांची डबल पर्सनॅलिटी असते असे आपण म्हणू शकतो.

Leave a Comment