गुगलमध्ये नोकरीची संधी ! ‘हे’ उमेदवार राहणार पात्र, पगार मिळणार तब्बल 83 हजार महिना, कुठं करणार अर्ज?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Google Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी गुगलच्या माध्यमातून एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरतर जगप्रसिद्ध टेक कंपनी गुगलमध्ये काम करण्याची अनेकांची इच्छा असते. यासाठी अनेक उमेदवार तयारी करत असतात.

जर तुमची देखील google मध्ये काम करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. गुगलने इंटर्नशिपसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इंटर्नशिपसाठी गुगलकडून अर्ज मागवले जात आहेत. यासाठी विंटर इंटर्नशिप 2024 ची गुगलने नुकतीच घोषणा केली आहे.

कम्प्युटर सायन्स किंवा अन्य संबंधित क्षेत्रात बॅचलर्स मास्टर्स किंवा ड्युअल डिग्री प्रोग्रामच्या अंतिम वर्षात शिकत असलेले उमेदवार यासाठी पात्र राहणार आहेत. निश्चितच या विंटर इंटर्नशिप 2024 अंतर्गत फ्रेशर्स उमेदवारांना गुगल सारख्या प्रतिष्ठित आणि नामांकित कंपनीमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

या प्रोग्राम मध्ये ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांची करिअरची सुरुवात ही धाकड राहणार आहे. यामुळे आयटी क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी हा एक चांगला ऑपशन राहणार आहे. विशेष म्हणजे इंटर्नशिपसाठी निवड झालेल्या उमेदवारांना तब्बल 83 हजार 947 रुपये प्रतिमहिना एवढे वेतन देखील दिले जाणार आहे.

तसेच यासाठी निवड होणाऱ्या उमेदवारांना कंपनीच्या कोअर प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेसमध्ये काम करण्याची एक मोठी चांगली संधी उपलब्ध होणार आहे. या अंतर्गत नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना गुगलच्या इंजिनीअरिंग ऑपरेशन्सच्या महत्त्वाच्या कार्यांमध्ये योगदान देता येणार आहे. दरम्यान आज आपण या इंटर्नशिप प्रोग्राम बाबत सविस्तर माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणते उमेदवार राहणार पात्र

गुगलमध्ये आयोजित झालेल्या इंटर्नशिप प्रोग्राम साठी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील पदवी तसेच मास्टर डिग्री आवश्यक आहे. याशिवाय C, C++, Java, JavaScript, Python या कोडिंग लैंग्वेजचे ज्ञान असणे देखील आवश्यक आहे.

इंटर्नशिपचा कालावधी किती राहणार

या अंतर्गत जानेवारी 2024 पासून इंटर्नशिपला सुरवात होणार आहे. तसेच इंटर्नशिपला सुरवात झाल्यानंतर 22 ते 24 आठवडे इंटर्नशिप सुरु राहणार आहे.

किती पगार मिळणार

याअंतर्गत नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना प्रति महिना 83 हजार 947 रुपये एवढे वेतन दिले जाणार आहे.

काम कुठे करावे लागणार?

बेंगलोर आणि हैदराबाद या दोन ठिकाणी काम करण्याची संधी राहणार आहे. उमेदवार आवडीनुसार कामाचे ठिकाण निवडू शकतात.

अर्ज कुठे करणार?

https://cse.noticebard.com/internships/google-winter-internship-2024/ या लिंकवर जाऊन अर्ज करता येणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक

1 ऑक्टोबर 2023 ही अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक राहणार आहे. विहित मुदतीत अर्ज सादर करायचा आहे. मुदतीनंतर कुठल्याही सबबीवर अर्ज सादर करता येणार नाही.

Leave a Comment