Government Decision On Gas Cylinder : काल 29 ऑगस्ट 2023 अर्थातच रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येवर केंद्रातील मोदी सरकारने एक महत्त्वाचा आणि अतिशय दिलासादायक असा निर्णय घेतला आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील माता आणि भगिनींचा जिव्हाळ्याच्या अशा महागाईच्या मुद्द्यावर काल महत्त्वाचा निर्णय झाला आहे.
खरंतर गेल्या काही वर्षांपासून महागाईचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे स्वयंपाक घरातील बजेट कोलमडले आहे. यामुळे सर्वसामान्य जनता मोदी सरकारवर नाराज आहे. अशातच पुढल्या वर्षी लोकसभा आणि काही राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामुळे सर्वसामान्य जनतेचे ही नाराजी मोदी सरकारला चांगलीच महागात पडणार असे सांगितले जात आहे. म्हणून आता मोदी सरकारने गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत तब्बल दोनशे रुपये कपात करण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार देशभरातील उज्वला योजनेअंतर्गत लाभार्थी असलेल्या गॅस ग्राहकांना दोनशे रुपयांनी स्वस्त सिलेंडर मिळणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या संपूर्ण देशात उज्वला योजनेचे जवळपास दहा कोटी लाभार्थी आहेत. आता या दहा कोटी लाभार्थ्यांना मोदी सरकारने दिलासा दिला आहे.
गॅस सिलेंडर उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार 400 रुपयांनी स्वस्त
खरंतर सध्या उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरवर दोनशे रुपयांची सूट मिळतं आहे. मात्र ही सूट अनुदान स्वरूपात दिली जात आहे. म्हणजेच सध्या उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दोनशे रुपयांची सबसिडी मिळत आहे. आता यामध्ये आणखी दोनशे रुपयांची अतिरिक्त सूट दिली जाणार आहे.
यानुसार, आता उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तब्बल चारशे रुपयांनी गॅस सिलेंडर स्वस्त मिळणार आहे. दरम्यान आता आपण उज्वला योजनेबाबत माहिती जाणून घेणार आहोत आणि याचा लाभ कोणाला दिला जात आहे याच्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार याबाबत थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणाला मिळतो उज्वला योजनेचा लाभ
या योजनेचा लाभ बीपीएल म्हणजेच बिलो पॉवर्टी लाईन अर्थातच दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना दिला जातो. या योजनेच्या लाभासाठी दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना त्यांचे बीपीएल कार्ड अपलोड करावे लागते. हे बी पी एल कार्ड फक्त त्याच कुटुंबांना मिळते ज्यांचे उत्पन्न दारिद्र्यरेषेखालील आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 27000 पेक्षा कमी आहे त्यांना बीपीएल कार्ड मिळते. म्हणजे 27000 रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांचा समावेश दारिद्र्यरेषेखाली होतो. परंतु ज्या लोकांचे यापेक्षा अधिक उत्पन्न असते त्यांचा दारिद्र्यरेषेखाली समावेश होत नाही.
उज्वला योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
हाती आलेल्या माहितीनुसार, उज्वला योजनेच्या लाभासाठी पात्र लाभार्थ्यांना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. यात कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड, पत्त्याच्या पुराव्यासाठी पाणी बिल, वीज बिल, ड्रायव्हिंग लायसन्स आणि रहिवासी प्रमाणपत्र, अर्जदाराचे जॉब कार्ड, गावप्रमुखाकडून मान्यता, बीपीएल कार्डची फोटो प्रत, BPL चा सर्व्हे नंबर आणि मोबाईल नंबर यांसारखी काही महत्त्वाचे कागदपत्रे लाभार्थ्यांना सादर करावी लागतात.