Government Employee DA Hike : सध्या राज्यासह संपूर्ण देशभरात निवडणुकीचे वारे वाहत असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय निवडणूक आयोगाने पुढील वर्षी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेणार असल्याचे संकेत दिले आहेत.
सोबतच पुढल्या वर्षी महाराष्ट्रात देखील विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रासह पुढील वर्षी देशातील इतरही काही महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका घेतल्या जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे येत्या काही दिवसात देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुकेसाठी मतदान होणार आहे. एकंदरीत देशभरात सर्वत्र आता निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. आगामी काही दिवसात ही रणधुमाळी आणखी तीव्र होणार आहे.
या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सरकारच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना देखील खुश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून केंद्र शासनाने ऑक्टोबर महिन्यात सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्के वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
यानुसार या संबंधित मंडळीचा महागाई भत्ता आता 46% एवढा झाला आहे. विशेष म्हणजे ही वाढ जुलै 2023 पासून लागू करण्यात आली आहे. अशातच आता आणखी एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने पाचवा वेतन आयोग अंतर्गत आणि सहावा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सहावा वेतन आयोग अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 9% एवढा वाढवण्यात आला आहे.
आतापर्यंत या कर्मचाऱ्यांना 221% एवढा महागाई भत्ता दिला जात होता मात्र यामध्ये आता नऊ टक्के वाढ झाली आहे म्हणजेच हा भत्ता 230% एवढा झाला आहे. ही वाढ जुलै 2023 पासून लागू करण्यात आली आहे.
तसेच पाचवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला आहे. खरे तर पाचवा वेतन आयोगअंतर्गत दोन कॅटेगरीमधील कर्मचाऱ्यांचा समावेश होतो.
एक म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनासह डीएच्या 50% विलीनीकरणाचा लाभ मिळालेला नाही आणि दुसरे म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांना मूळ वेतनासह डीएच्या 50% विलीनीकरणाचा लाभ मिळत आहे. दरम्यान यातील 50% डीए विलीनीकरण लाभ न मिळालेल्या कर्मचाऱ्यांचा डीए 477% एवढा करण्यात आला आहे.
आधी हा 462% होता. म्हणजे यात 15% एवढी घसघशीत वाढ झाली आहे. तसेच, मूळ वेतनासह डीएच्या 50% विलिनीकरणाचा लाभ देण्यात आलेल्यांचा डीए 427% करण्यात आला आहे. आधी हा 412% एवढा होता. म्हणजे यामध्ये देखील 15% एवढी वाढ झाली आहे.