पंजाबरावांचा शेतकऱ्यांना तातडीचा मॅसेज ! ‘या’ तारखेपासून महाराष्ट्रातील ‘त्या’ भागात कोसळणार धो-धो पाऊस, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आली आहे. खरंतर, सध्या राज्यातील शेतकरी बांधव रब्बी हंगामातील पीक व्यवस्थापनासाठी काबाडकष्ट करत आहेत. शेतकऱ्यांची शेती-शिवारात लगबग सुरू आहे.

काही ठिकाणी रब्बी हंगामातील गव्हाची आणि हरभऱ्याची पेरणी पूर्ण झाली आहे तर काही ठिकाणी अजून पेरणीची कामे बाकी आहेत. ज्या भागात गव्हाची आणि हरभऱ्याची पेरणी पूर्ण झाली आहे तेथील शेतकरी बांधव पीक वाढीसाठी आवश्यक असलेल्या कामांमध्ये गुंग आहेत.

तथापि, काही भागात यंदा रब्बी हंगामातील पिकांची पेरणी होणार नसल्याचे विदारक दृश्य पाहायला मिळत आहे. कमी पावसामुळे राज्यातील काही भागांमध्ये यंदा रब्बी हंगामातील पिकांची पेरणी होणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे पेरणी तर सोडाच पण काही भागात अक्षरशः पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांसहित राज्यातील सर्वसामान्य जनता चिंतेत पाहायला मिळत आहे.

दरम्यान दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा महाराष्ट्राला आता ऐन हिवाळ्यात पाऊस ओलेचिंब भिजवणार असे चित्र तयार होत आहे. कारण की भारतीय हवामान खात्याने आगामी काही दिवस राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

यामुळे ज्या भागात मान्सूनकाळात कमी पाऊस पडला आहे, त्या भागासाठी हा पाऊस फायदेशीर ठरेल आणि यामुळे शेतकऱ्यांसहित सर्वसामान्यांना दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.

पण उद्या उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात गारपीट होईल असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे संबंधित भागातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

गारपीटमुळे संबंधित भागातील शेतकऱ्यांचे मोठ नुकसान होण्याची शक्यता आहे. अशातच जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी देखील त्यांचा नवीन हवामान अंदाज जारी केला आहे. पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे, महाराष्ट्रात आजपासून अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे.

राज्यातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणात 25 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. मात्र हा अवकाळी पाऊस राज्यात सर्वदूर पडणार नाही.

म्हणजेच जर एखाद्या जिल्ह्यातील काही भागात पाऊस झाला तर काही भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. दरम्यान या कालावधीत पडणारा पाऊस हा विजांच्या कडकडाटासह बरसेल असा अंदाज आहे. यामुळे शेतकऱ्यांसहित सर्वसामान्य नागरिकांनी विशेष काळजी घेणे अपेक्षित आहे.

Leave a Comment