सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! बेसिक सॅलरी 8000 रुपयांनी वाढणार, शासनाच्या ‘या’ निर्णयामुळे पगारात होणार मोठी वाढ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th Pay Commission : जर तुम्ही सरकारी खात्यात सरकारी नोकरदार म्हणून कामाला असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा तुमच्या फ्रेंड सर्कल मधून कोणी सरकारी खात्यात कामाला असेल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी लवकरच 8 हजार रुपयांपर्यंत वाढणार आहे. खरे तर पुढील वर्षी अर्थातच 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने देशभरातील सर्वसामान्य नागरिकांना खुश करण्यासाठी नुकतेच काही मोठे निर्णय घेतले आहेत.

यामध्ये गॅस सिलेंडरच्या किमती कमी करणे, गव्हाचे पीठ स्वस्तात उपलब्ध करून देणे, मोफत रेशनच्या योजनेला पुढील पाच वर्षांसाठी मुदत वाढ देणे इत्यादी निर्णयांचा समावेश होतो.

अशातच आता मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी येत्या केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्र शासनाकडून फिटमेंट फॅक्टरबाबत मोठा निर्णय घेतला जाणार आहे.

मोदी सरकार फिटमेंट फॅक्टर वाढवणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे या मंडळीचा बेसिक सॅलरी म्हणजे मूळ पगार वाढणार आहे. सध्या फिटमेंट फॅक्टर 2.57 पट एवढा आहे.

मात्र यामध्ये वाढ होईल आणि हा फॅक्टर 3.68 पट एवढा होईल अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान शासनाने हा निर्णय घेतल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन वाढणार आहे.

किती वाढणार किमान मूळ वेतन ?

जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांना साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकतर आधीच ही मंडळी जुनी पेन्शन योजनेमुळे सरकारवर नाराज आहे.

अशा परिस्थितीत जर ही मंडळी अशीच नाराज राहिली तर आगामी इलेक्शन मध्ये सरकारला मोठा फटका बसण्याची शक्यता. या मंडळीची वोट बँक पाहता यांना खुश करण्याचा आता प्रयत्न केला जाणार आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून फिटमेंट फॅक्टर वाढवणार आहे.

हे फिटमेंट फॅक्टर वाढल्यास सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन तब्बल आठ हजार रुपयांनी वाढणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन हे 18 हजार रुपये एवढे आहे. पण हा फॅक्टर वाढल्यानंतर हे वेतन 26 हजार रुपये एवढे होणार आहे.

Leave a Comment