शुभमंगल सावधान ! पुढील वर्षी मे आणि जूनमध्ये लग्नाला एकही मुहूर्त नाही; पण जानेवारी ते एप्रिल 2024 मध्ये आहेत भरपूर तारखा, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vivah Muhurta 2024 : काल शुक्रवारी अर्थातच 24 नोव्हेंबर 2023 रोजी तुळशी विवाह संपन्न झाला आहे. तुळशी विवाह झाल्यानंतर आपल्याकडे लग्नाचा हंगाम सुरू होत असतो. तुळशी विवाहाला खानदेशात खोपडी म्हणून ओळखले जाते. हा खोपडीचा सण साजरा झाला की लगेचचं लग्नसराईला सुरुवात होते. म्हणजेच आज 25 नोव्हेंबर 2023 पासून लग्न सराईला सुरुवात झाली आहे.

लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच सोने आणि चांदीच्या बाजारभावात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. दरम्यान रेशीमगाठी जुळून आलेल्या लग्नाळूंसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती समोर आली आहे. ती म्हणजे तुळशी विवाहानंतर लग्नासाठी मुहूर्ताची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2023 पासून ते डिसेंबर 2024 पर्यंत जुळून आलेल्या रेशीमगाठी बांधण्यासाठी अर्थातच लग्नासाठी तब्बल 77 तारखा ग्रह नक्षत्रानुसार शुभ आहेत. त्यामुळे यंदा अनेकांना शुभमंगल सावधान करण्यासाठी मुहूर्ताच्या तारखा मुबलक असल्याचे सांगितले जात आहे.

ज्योतिष तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी अधिक मास होता. नेमका अधिकमास हा श्रावण महिन्यात आला. याचा परिणाम म्हणून या वर्षी लग्न सराईला थोडा उशीर झाला आहे. मात्र आता आजपासून खऱ्या अर्थाने लग्न सराईला सुरुवात झाली आहे. दरम्यान पुढील वर्षी, 2024 मधील मे आणि जून महिन्यात लग्नाची तारीख निघणार नसल्याचे सांगितले गेले आहे.

गुरु आणि शुक्र अस्ताचा अडथळा तयार होत असल्याने या दोन महिन्यात लग्नासाठी शुभमुहूर्त नसल्याचे बोलले जात आहे. परंतु लग्नाळू लोकांनी चिंता करण्याचे काही कारण नाही. कारण की हे दोन महिने बदलले तर लग्नासाठी भरपूर मुहूर्त आहेत. या चालू नोव्हेंबर महिन्यात लग्नासाठी तीन मुहूर्त आणि पुढल्या डिसेंबर महिन्यात दहा मुहूर्त आहेत.

याशिवाय जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीत शुभमंगल सावधान करण्यासाठी तब्बल 42 तारखा शुभ असल्याचे ज्योतिष तज्ञांनी सांगितले आहे. यानंतर मात्र मे आणि जून महिन्यात लग्नासाठी एकही शुभ तारीख नाही. यामुळे काही लोकांचे निश्चितच निराशा होऊ शकते. नाहीतर अनेक जण मे आणि जून महिन्यात लग्न करण्याला पसंती दाखवतात.

त्याचे कारण म्हणजे शाळकरी विद्यार्थ्यांना आणि कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या कालावधीमध्ये सुट्ट्या असतात. पण मे आणि जून महिन्यात लग्नासाठी एकही मुहूर्त निघत नसल्याचे ज्योतिष तज्ञांनी नमूद केले आहे. मात्र जुलै महिन्यात लग्नासाठी सहा शुभमुहूर्त आहेत. त्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात 16 शुभमुहूर्त आहेत. या 16 पैकी 12 मुहूर्त डिसेंबर महिन्यात आहेत.

दरम्यान, ज्योतिष तज्ञांनी मे आणि जून महिन्यात लग्नासाठी शुभमुहूर्त नसल्याचे सांगितले असले तरी देखील जर या कालावधीमध्ये लग्न करणे अनिवार्य असेल तर कोणत्याही तारखेला न करता योग्य तिथी व नक्षत्रांचा विचार करून लग्न करावे लागणार आहे. त्यासाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला घ्यावा लागणार आहे. दरम्यान आता आपण नोव्हेंबर, डिसेंबर 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त आहेत याबाबत तारखा निहाय जाणून घेणार आहोत.

नोव्हेंबर 2023 : 27, 28 आणि 29 नोव्हेंबर हे लग्नासाठी शुभ मुहूर्त आहेत.

डिसेंबर 2023 : या महिन्यातील 6,7,8, 14, 15, 17,  20,  21, 25, 29 या तारखा लग्नासाठी शुभ आहेत.

जानेवारी 2024 : या महिन्यातील 2, 3, 4, 5, 6, 8, 17, 22, 27, 28, 30, 31 या तारखा लग्नासाठी शुभ आहेत.

फेब्रुवारी 2024 : या महिन्यातील 1, 4, 6, 12, 13, 14, 17, 18, 26, 27, 28, 29 या तारखांना लग्नासाठी शुभ मुहूर्त राहणार आहे.

मार्च 2024 : या महिन्यातील 3, 4, 6, 11, 16,  17,  26, 27,  30 या तारखांना लग्नासाठी शुभ मुहूर्त राहतील अशी माहिती तज्ञांनी दिली आहे.

एप्रिल 2024 : या महिन्यातील 1, 3, 4, 5, 18, 20, 21, 22, 23 या तारखांना लग्नासाठी शुभ मुहूर्त राहील.

जुलै 2024 : या महिन्यातील 9, 11, 12, 13, 14, 15 या तारखा लग्नासाठी शुभ राहणार आहेत.

नोव्हेंबर 2024 : या महिन्यातील 17, 23, 26, 27 या तारखा लग्नासाठी शुभ राहतील.

डिसेंबर 2024 : या महिन्यातील 3, 5, 6, 7, 11, 12, 14, 15, 20, 23, 26 या तारखा लग्नासाठी शुभ राहणार असल्याची माहिती ज्योतिष तज्ञांनी दिली आहे.

Leave a Comment