Government Employee DA Hike : नुकत्याच काही दिवसांपूर्वी देशात नवरात्र उत्सवाचा पवित्र सण साजरा झाला आहे. यंदाचा नवरात्र उत्सव मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूपच खास ठरला आहे. कारण की, नवरात्र उत्सवाच्या काळात केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला आहे.
आधी महागाई भत्ता 42 टक्के एवढा होता मात्र यामध्ये चार टक्के वाढ करण्याचा निर्णय झाला आणि आता हा महागाई भत्ता 46% एवढा झाला आहे. केंद्राने हा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा देखील महागाई भत्ता 46 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे.
रेल्वे बोर्डाने देखील रेल्वे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. या सर्व कर्मचाऱ्यांचा हा वाढीव महागाई पत्ता जुलै महिन्यापासून लागू करण्यात आला आहे. यामुळे या संबंधितांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील मिळणार आहे.
महागाई भत्ता आणि महागाई भत्ता फरकाची ही रक्कम संबंधितांना या चालू महिन्याच्या वेतनासोबत मिळणार आहे. यामुळे सणासुदीच्या काळात या संबंधित सरकारी नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे संबंधितांच्या माध्यमातून शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.
विविध संघटनांनी शासनाच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे. दिवाळीच्या पूर्वीच हा निर्णय झाला असल्याने या निर्णयाचे विशेष कौतुक केले जात आहे. अशातच आता राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी देखील महागाई भत्ता संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
एका मीडिया रिपोर्टनुसार, महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाने राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून चार टक्के महागाई भत्ता वाढ लागू करणे बाबतचा सविस्तर प्रस्ताव तयार केला आहे. यामुळे आता याबाबतचा अधिकृत शासन निर्णय केव्हा निघणार याकडे संपूर्ण राज्य कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान, याबाबतचा अधिकृत शासन निर्णय अर्थातच जीआर येत्या दोन दिवसात म्हणजेच 31 ऑक्टोबर अखेरपर्यंत निर्गमित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे हा ऑक्टोबर महिना राज्य कर्मचाऱ्यांसाठी खास ठरणार आहे. दिवाळी सणाच्या पूर्वीच राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार असल्याने त्यांची देखील दिवाळी गोड होईल असे सांगितले जात आहे.
मात्र येत्या दोन दिवसांत अधिकृत शासन निर्णय निर्गमित झाला तरी देखील राज्यातील ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन देयक तयार झाले आहे त्या कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याच्या पगारांसोबत याचा रोखीने लाभ मिळू शकणार नाहीये. पण ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन देयक तयार होणार नाही त्यांना ऑक्टोबर महिन्याच्या वेतनासोबत याचा रोखीने लाभ मिळणार आहे.