30 आणि 31 ऑक्टोबरला महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पाऊस पुन्हा हजेरी लावणार ! तुमच्या जिल्ह्यातील हवामान कसे राहणार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Havaman Andaj : राज्यातील हवामानात अचानक मोठा चेंज आला आहे. राज्यात एकीकडे दिवसेंदिवस तापमानाचा पारा घसरत आहे तर दुसरीकडे आज आणि उद्या महाराष्ट्रातील काही भागात पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.

हवामान खात्याने आज 30 ऑक्टोबर रोजी आणि उद्या 31 ऑक्टोबर रोजी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडणार असा अंदाज वर्तवला आहे. यामुळे रब्बी पिकांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरेल असा आशावाद व्यक्त होत आहे. खरंतर, यावर्षी मानसून काळात वरूणराजाने महाराष्ट्राकडे पाठ फिरवली होती. यावर्षी मान्सून काळात महाराष्ट्रात खूपच कमी पाऊस बरसला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, यंदा महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत 12 टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे खरीप हंगाम संकटात आला असून आगामी रब्बी हंगाम देखील यामुळे संकटात येणार आहे. काही ठिकाणी रब्बी हंगामातील पिकांची पेरणी देखील होणार नाही असे भयावय चित्र तयार होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

दरम्यान राज्यात गेल्या काही दिवसांपासून सकाळच्या तापमानात मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. राज्यात आता गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. आगामी काही दिवसात थंडीची तीव्रता वाढणार आहे.

हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळी झाल्यानंतर अर्थातच 15 नोव्हेंबर नंतर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी मात्र महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली असून आज आणि उद्या राज्यातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडणार असा अंदाज आहे.

कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस ?

आज 30 ऑक्टोबर 2023 रोजी राज्यातील सिंधुदूर्ग जिल्ह्यात वादळ, विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडणार असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातही आज पावसासाठी पूरक परिस्थिती तयार होणार असून आज या दोन्ही जिल्ह्यातील काही ठिकाणी हलका पाऊस बरसणार असल्याचा अंदाज आहे.

तसेच उद्या देखील महाराष्ट्रात पावसासाठी पूरक परिस्थिती राहणार आहे. उद्या 31 ऑक्टोबर रोजी कोकणातील सिंधुदूर्ग जिल्ह्यात पाऊस पडणार असा अंदाज असून या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने जारी केला आहे.

यामुळे हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरतो का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहे. दरम्यान जर हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरला तर रब्बी हंगामाची तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून यामुळे रब्बी पिकांना मोठा फायदा मिळणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Leave a Comment