Government Employee DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. जर तुम्ही सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा मित्र परिवारांमधून कोणी सरकारी कर्मचारी म्हणून सेवा देत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी विशेष खास ठरणार आहे.
खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता अर्थातच डीए वाढीचा लाभ मिळतो. पहिल्या सहामाहीत म्हणजेच जानेवारी ते जून आणि दुसऱ्या सहामाहीत म्हणजे जुलै ते डिसेंबर या कालावधीत सरकारी नोकरदार मंडळीला महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जात असतो.
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46 टक्के या दराने महागाई भत्ता मिळत आहे. आता जानेवारी 2024 पासून महागाई भत्त्यामध्ये किती वाढ होणार ? हा मोठा प्रश्न संबंधितांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
अशातच आता महागाई भत्ता संदर्भात एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, महागाई भत्ता वाढ ही ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारावर ठरवली जाते.
दरम्यान, केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून माहे नोव्हेंबर 2023 पर्यंतचे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आलेले आहेत. जुलै ते नोव्हेंबर 2023 या AICPI च्या निर्देशांकाचा विचार केला असता डीए मध्ये 4.90 टक्क्यांची वाढ होणे अपेक्षित आहे.
विशेष म्हणजे डिसेंबर 2023 चे निर्देशांक येणे बाकी आहे. यामुळे यावेळी महागाई भत्त्यात पाच टक्क्यांची वाढ होणे जवळपास फिक्स असल्याचे मत जाणकार लोकांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे.
अर्थातच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता जानेवारी 2024 पासून पाच टक्क्यांची वाढ होऊ शकते. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46% एवढा असून यामध्ये आणखी पाच टक्के म्हणजेच महागाई भत्ता 51 टक्क्यांवर जाण्याची शक्यता जाणकार लोकांच्या माध्यमातून व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. दरम्यान, सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाले की लगेचच देशात आचारसंहिता लागू होणार आहे.
यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढीची घोषणा होणार असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.
एक फेब्रुवारी 2024 ला मोदी सरकार आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार असून या अर्थसंकल्पातच महागाई भत्ता वाढीबाबतची घोषणा होऊ शकते असे देखील मत काही तज्ञांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आले आहे. यामुळे आता महागाई भत्ता वाढीची घोषणा केव्हा होते हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.