पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक केल्यास मिळणार जोरदार रिटर्न, FD पेक्षा अधिक रिटर्न मिळणार, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Scheme : भारतात गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड या जोखीमपूर्ण ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाऊ लागली आहे. याशिवाय, अनेकजण सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेची एफ डी योजना, बँकेची आरडी योजना, पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या बचत योजना यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत.

जर तुम्हीही सुरक्षित गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन हजर झालो आहोत. आज आपण पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट योजनेबाबत जाणून घेणार आहोत.

खरेतर अनेकजण या योजनेला एफडी योजना म्हणूनच ओळखतात. कारण की या योजनेचे स्वरूप हे एफडी योजनेप्रमाणेच आहे. मात्र पोस्ट ऑफिसच्या या योजनेला टाईम डिपॉझिट योजना अर्थातच टीडी योजना म्हणून ओळखले जाते.

या योजनेत एफडीप्रमाणेच एकदा गुंतवणूक करावी लागते आणि या गुंतवणुकीवर पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून व्याज दिले जाते. ही पोस्ट ऑफिसची एक छोटी बचत योजना आहे.

ही टाईम डिपॉझिट स्कीम 1, 2, 3 आणि 5 वर्षांसाठी असते. पोस्ट ऑफिसच्या या टाईम डिपॉझिट स्कीम मध्ये किमान एक हजार रुपयांपासून गुंतवणूक करता येते. एक हजाराची गुंतवणूक केल्यानंतर मग पुढे 100 च्या पटीत गुंतवणूक वाढवली जाते.

येथे गुंतवणूक करण्याची कमाल मर्यादा ठरवून देण्यात आलेली नाही. म्हणजेच गुंतवणूकदाराला जेवढी रक्कम हवी आहे तेवढी रक्कम तो या योजनेत गुंतवू शकतो.

किती व्याज मिळते ?

पोस्ट ऑफिसकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक वर्षाच्या टाईम डिपॉझिट योजनेसाठी 6.9%, दोन वर्षाच्या टाईम डिपॉझिट योजनेसाठी सात टक्के, तीन वर्षाच्या टाईम डिपॉझिट योजनेसाठी 7.1% आणि पाच वर्षाच्या टाईम डिपॉझिट योजनेसाठी 7.5% एवढे व्याज दिले जात आहे.

5 लाख गुंतवले तर किती रिटर्न मिळणार

जर या पोस्ट ऑफिसच्या लोकप्रिय योजनेत एखाद्या गुंतवणूकदाराने एका वर्षाच्या कालावधीसाठी 5 लाख रुपये गुंतवलेत तर अशा गुंतवणूकदाराला मॅच्युरिटीवर 5 लाख 35 हजार 403 रुपये मिळणार आहेत.

दोन वर्षासाठी या योजनेत 5 लाख गुंतवले तर अशा गुंतवणूकदाराला मॅच्युरिटीवर पाच लाख 74 हजार 441 रुपये मिळणार आहेत.

तीन वर्षांच्या कालावधीसाठी या योजनेत 5 लाख रुपये गुंतवले तर गुंतवणूकदाराला मॅच्युरिटीवर 6 लाख 17 हजार 538 रुपये मिळणार आहेत. जर 5 वर्षांच्या कालावधीसाठी या योजनेत पाच लाख रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीवर 7 लाख 24 हजार 974 रुपये मिळणार आहेत.

Leave a Comment