Government Employee DA Hike Update : जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी सरकारी सेवेत कार्यरत असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आणि कामाची ठरणार आहे. खरंतर, येत्या आठ ते नऊ दिवसात संपूर्ण देशात दिवाळीचा आनंददायी पर्व साजरा होणार आहे.
दिवाळीनंतर अवघ्या दिड महिन्यानंतर नववर्षाला सुरुवात होणार आहे. दरम्यान नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळणार असे वृत्त समोर आले आहे.
खरंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे.आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46 टक्के या दराने महागाई भत्ता मिळणार आहे.
आधी हा महागाई भत्ता 42 टक्के एवढा होता. दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली ही महागाई वाढ जुलै महिन्यापासूनची आहे.
यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील मिळणार आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम दिली जाणार आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढ मिळते. जानेवारी महिन्यात आणि जुलै महिन्यात ही वाढ लागू केली जाते. महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा सुधारणा होत असल्याने आता पुढील सुधारणा जानेवारी महिन्यात होणार आहे.
विशेष म्हणजे जानेवारी 2024 पासून 5% डीए वाढ लागू केली जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा सध्याचा 46% महागाई भत्ता 51 टक्क्यांवर पोहोचणार आहे.
यामुळे आगामी नवीन वर्ष संबंधित नोकरदार वर्गासाठी मोठे आनंदाचे ठरणार आहे. नवीन वर्षात सरकारी नोकरदार वर्गाला विक्रमी महागाई भत्ता वाढीची भेट मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
मात्र महागाई भत्तातील ही वाढ AICPI च्या आकडेवारीनुसार ठरवली जाणार आहे. यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत या आकडेवारीत किती वाढ होते यावरच महागाई भत्ता वाढ अवलंबून राहणार आहे.
परंतु सध्या स्थितीला असलेली एआयसीपीआयची आकडेवारी पाहता जानेवारी महिन्यात महागाई भत्त्यात पाच टक्क्यांपर्यंतची वाढ होऊ शकते असे मत काही जाणकार लोकांकडून वर्तवण्यात आले आहे. निश्चितच असे झाले तर संबंधितांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.