Government Employee DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून मीडिया रिपोर्ट मध्ये महागाई भत्ता 50% झाल्यानंतर सदर डीएची रक्कम ही मूळ पगारात जोडली जाणार असे वृत्त झळकु लागले आहे.
यामुळे खरंच सरकारच्या माध्यमातून असा निर्णय घेतला जाणार आहे का? याबाबत सातवा वेतन आयोगात काही तरतूद होती का? असे प्रश्न कर्मचाऱ्यांना पडलेले आहेत. दरम्यान आज आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जसं की आपणास ठाऊकच आहे की, शासनाच्या माध्यमातून वर्षातून दोनदा महागाई भत्ता आणि महागाई सवलत वाढवला जातो. साधारणतः पहिल्या सहामाहित म्हणजेच जानेवारी ते जून या सहा महिन्यांचा महागाई भत्ता मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत वाढवला जात असतो.
या चालू वर्षातील पहिल्या सहामाहितील महागाई भत्ता देखील मार्च अखेरपर्यंत वाढवला जाईल असे बोलले जात आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46% एवढा महागाई भत्ता मिळत आहे.
यात मात्र आणखी चार टक्के वाढ होणार असा अंदाज आहे. म्हणजेच जानेवारी ते जून 2024 या कालावधीसाठी 50 टक्के दराने डीए मिळू शकतो.
दरम्यान पन्नास टक्के डीए झाल्यानंतर डीए ची रक्कम ही मूळ पगारात जोडली जाईल आणि महागाई भत्ता पुन्हा एकदा झिरो होईल असे बोलले जात आहे.
मात्र या मागची सत्यता काय आहे खरंच शासनाचा काही निर्णय घेणार आहे का ? सातवा वेतन आयोगात किंवा सहावा वेतन आयोगात याबाबतची शिफारस करण्यात आली होती का हेच आपण आज पाहणार आहोत.
महागाई भत्ता ५० टक्क्यांपर्यंत पोहोचल्यानंतर ते मूळ वेतनात विलीन केले जाईल आणि महागाई भत्ता शून्य होईल आणि महागाई भत्त्यात नव्याने वाढ होईल, असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये होत आहे.
पण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की असे काहीही होणार नाही. कारण सातव्या वेतन आयोगाने अशी शिफारस केलेली नाही. सहाव्या वेतन आयोगानेही अशी कोणतीही शिफारस केलेली नाही.
पण, 50 टक्के महागाई भत्त्यानंतर सरकार 8 वा वेतन आयोग स्थापन करणार का, हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. तूर्तास मात्र शासनाने सध्या तरी आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबत शासन दरबारी कोणताच विचार सुरू नसल्याचे सांगितले आहे.