केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतिक्षा संपली ! ‘या’ तारखेला जमा होणार खात्यात मोठी रक्कम, थकीत महागाई भत्ताबाबत सरकारचा मोठा निर्णय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government Employee News : या चालू वर्षात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाचणार आहे. याशिवाय यावर्षी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका देखील होणार आहेत. येत्या काही महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून देखील वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत.

दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी देखील केंद्रातील मोदी सरकार एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त सध्या प्रसार माध्यमांमध्ये झळकु लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना काळात थकीत असलेली केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांची महागाई भत्ता थकबाकी आता त्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. कोरोना काळातील 18 महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी संबंधितांना देऊ केली जाणार असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.

खरेतर ही महागाई भत्ता थकबाकी शासनाने ताबडतोब कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली पाहिजे अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून जोर धरत आहे.

मात्र केंद्रातील मोदी सरकार या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे चित्र आहे. पण आता आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मागणीवर सकारात्मक निर्णय होणार असे बोलले जात आहे.

निश्चितच जर शासनाने या मागणीवर सकारात्मक निर्णय घेतला आणि संबंधितांच्या खात्यात 18 महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी जमा केली तर संबंधितांना मोठा दिलासा मिळणार आहे.

केंद्र सरकारने जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंत डीए थकबाकीचे पैसे दिलेले नाहीत. यामुळे हे पैसे लवकरात लवकर मिळावेत यासाठी कर्मचारी सातत्याने मागणी करत आहेत.

आता कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 18 महिन्यांच्या रकमेत बंपर लाभ मिळणार असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. जर असे झाले तर उच्च श्रेणीतील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सुमारे 2 लाख 18 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.

परंतु केंद्रातील मोदी सरकारने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे खरंच याबाबत निर्णय घेतला जातो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

Leave a Comment