सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, महागाई भत्ता वाढीनंतर आता ‘हे’ भत्तेही वाढलेत, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government Employee News : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुढीपाडव्याच्या आधीच आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे महागाई भत्ता 50% झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचे आणखी काही भत्ते वाढवण्यात आले आहेत. जस की आपणास ठाऊकच आहे की केंद्रीय कर्मचाऱ्यांचा जानेवारी महिन्यापासूनचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्यात आला आहे.

जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता वाढीचा हा निर्णय लागू झाला असून याचा रोख लाभ मार्च महिन्याच्या पगारांसोबत दिला गेला आहे. विशेष म्हणजे, यासोबत जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील मिळालेली आहे.

त्यामुळे उन्हाळी सुट्ट्यांच्या दिवसात आणि सणासुदीच्या दिवसात केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव पगार मिळाला आहे. महागाई भत्ता वाढल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे आणखी सहा प्रकारचे भत्ते वाढवले गेले आहेत.

केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अधिकृत निवेदनानुसार, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी 6 प्रकारचे भत्ते वाढवण्यात आले आहेत.  यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार अशी आशा व्यक्त होत आहे.

दरम्यान, आता आपण केंद्रीय कर्मचाऱ्यांचे कोणकोणते भत्ते वाढवण्यात आले आहेत ? केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या अधिकृत निवेदनात कोणकोणत्या भत्यात सुधारणा झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचे कोणकोणते भत्ते वाढलेत

ओव्हर टाईम भत्ता : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा ओटीए भत्ता म्हणजेच ओव्हर टाईम भत्ता वाढवण्याचा निर्णय झाला आहे.

अपंग महिला कर्मचाऱ्यांसाठी भत्ता : अपंग महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या नवजात बालकाच्या संगोपनासाठी भत्ता दिला जात आहे. बालकाचा जन्म झाल्यापासून तर दोन वर्षाच्या कालावधीपर्यंत दरमहा 3000 रुपये एवढा भत्ता अपंग महिला कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे.

बाल शिक्षण भत्ता : ज्या कर्मचाऱ्यांना दोन मुले आहेत त्यांना हा भत्ता मिळणार असून आता हा भत्ता 25% एवढा करण्यात आला आहे. बाल शिक्षण भत्ता किंवा वस्तीगृह अनुदान म्हणून 6 हजार 750 रुपये प्रति महिना मिळणार आहे. जर अपंग मुले असतील तर बाल शिक्षण भत्ता दुप्पट होणार आहे.

नाईट ड्युटी भत्ता : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा नाईट ड्युटी भत्ता देखील वाढवण्यात आला आहे. रात्री 11 ते सकाळी सहा पर्यंत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिला जाणारा नाईट ड्युटी भत्ता वाढवण्याचा निर्णय झालेला आहे.

जोखीम भत्ता : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा जोखीम भत्ता देखील वाढला आहे. जे धोकेदायक ठिकाणी कामाला आहेत त्या कर्मचाऱ्यांना हा भत्ता दिला जातो. ज्यांच्या कामामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते अशा कर्मचाऱ्यांना हा भत्ता मिळतो.

संसदीय सहायक भत्ता : संसदेच्या अधिवेशनादरम्यान संसदीय कामकाजात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांना हा भत्ता मिळत असतो. दरम्यान या विशेष भत्त्याचे दर सध्याच्या दरांच्या तुलनेत 50 टक्क्यांनी वाढले असल्याचे सदर शासन परिपत्रकात म्हटले आहे.

Leave a Comment