Government Employee News : येत्या वर्षात अर्थातच 2024 मध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. सामान्य नागरिकांसाठी विविध योजना शासनाकडून राबवल्या जात आहेत.
यातच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी देखील काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच काही महत्त्वाचे निर्णय घेणे प्रस्तावित करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्र शासन आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना तसेच निवृत्तीवेतनधारक आणि कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांना आता शासन एक मोठी भेट देणार आहे.
या संबंधित कर्मचाऱ्यांना आता महागाई भत्ता थकबाकीची रक्कम मिळणार आहे. तसेच DA वाढीचा देखील लाभ मिळणार आहे. दरम्यान, आज आपण केंद्रीय कर्मचाऱ्यांना कोणत्या काळातील महागाई भत्ता थकबाकीची रक्कम मिळणार आहे आणि याबाबतचा निर्णय केव्हा होऊ शकतो ? या संदर्भात काय अपडेट समोर आले आहे हे जाणून घेणार आहोत.
जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढ लागू होणार
केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून तीन टक्के महागाई भत्ता वाढ दिली जाणार असा दावा केला जात आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने डीए मिळत आहे. यात मात्र आता तीन टक्के वाढ होणार असे सांगितले जात आहे. याचाच अर्थ आता कर्मचाऱ्यांना 45% दराने डीए मिळणार आहे. विशेष म्हणजे ही वाढ जुलै महिन्यापासून लागू केली जाणार आहे.
यामुळे जेव्हा ही वाढ लागू होईल तेव्हा महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील संबंधित कर्मचाऱ्यांना वितरित होणार आहे. याबाबत शासनाकडून अधिकारीक घोषणा करण्यात आलेली नाही मात्र येत्या काही दिवसात या संदर्भात निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.
जर शासनाने हा निर्णय घेतला तर निश्चितच कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे.कोणत्या काळातील महागाई भत्ता थकबाकी मिळणार? खरंतर 2020 मध्ये कोरोना नामक महामारी आली होती. या आजाराचा संपूर्ण जगात हाहाकार पाहायला मिळाला होता. या आजारामुळे जगाची अर्थव्यवस्था धोक्यात आली होती.
शासन तिजोरीवर या आजारामुळे विपरीत परिणाम पाहायला मिळाला. अशा परिस्थितीत केंद्र शासनाने कोरोना कालावधीमध्ये जवळपास 18 महिने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा आणि निवृत्तीवेतनधारकांचे तसेच कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांचा महागाई भत्त्याचा लाभ थांबवला होता.
कोरोना संसर्ग महामारीमुळे 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 या 18 महिने कालावधीत म्हणजेच दीड वर्षाचा महागाई भत्ता रोखला होता.दरम्यान ही महागाई भत्ता थकबाकी आता अर्थव्यवस्था रुळावर आली असल्याने कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर दिली पाहिजे अशी मागणी कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून शासनाकडे केली जात आहे.
दरम्यान शासन याबाबत सकारात्मक असून लवकरच याविषयी निर्णय होऊ शकतो असे सांगितले जात आहे. शासनाने याबाबत कोणतीच अपडेट दिलेली नाही, पण आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याबाबतचा निर्णय शासनाकडून घेतला जाऊ शकतो असे सांगितले जात आहे.