Government Employee News : यंदाचा नवरात्र उत्सव सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूपच खास राहिला आहे. कारण की नवरात्र उत्सवात सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला आहे. केंद्र शासनाने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार, महागाई भत्ता 46 टक्के एवढा झाला आहे.
विशेष म्हणजे ही वाढ जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली आहे. याआधी महागाई भत्ता हा 42 टक्के एवढा होता. यामध्ये चार टक्के वाढ झाली असून आता DA 46% एवढा बनला आहे. तसेच DA वाढीचा हा सुधारित लाभ ऑक्टोबर महिन्याच्या वेतनासोबत म्हणजेच पेड इन नोव्हेंबरच्या वेतनासोबत दिला जाणार आहे.
यासोबतच केंद्रीय कर्मचाऱ्यांना DA थकबाकी देखील मिळणार आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांची DA थकबाकी सुद्धा येत्या पगारासोबत दिली जाणार आहे. यामुळे ऐन दिवाळी सणाच्या पूर्वीच Government Employee ला मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे. सणासुदीच्या काळात सरकारी नोकरदारांकडे मोठा पैसा राहणार आहे. यामुळे त्यांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे.
केंद्र शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे संबंधित नोकरदार वर्गांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला असल्याने आता महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या 17 लाख राज्य कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
यासाठी पाठपुरावा देखील सुरू झाला आहे. राज्यातील कर्मचारी संघटनांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. यासाठी कर्मचारी संघटनांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र देखील पाठवण्यात आले आहे.
यामुळे आता एकनाथ शिंदे याबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अशातच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ऐन सणासुदीच्या काळात ही अपडेट खूपच खास राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाल्यानंतर आणखी एक गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे.
ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचा घर भाडे भत्ता वाढणार आहे. घर भाडे भत्त्यात जवळपास तीन टक्के एवढी वाढ होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक्स, वाय आणि झेड श्रेणीनुसार अनुक्रमें 27 टक्के, 18 टक्के आणि 9 टक्के एवढा घरभाडे भत्ता दिला जात आहे.
पण आता यामध्ये सुधारणा होणार घरभाडे भत्ता तीन टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. म्हणजेच एक्स श्रेणी कर्मचाऱ्यांचा घर भाडे भत्ता हा 27 टक्क्यांवरून 30 टक्के, Y श्रेणी कर्मचाऱ्यांचा 18 टक्क्यांवरून 20 टक्के आणि Z श्रेणी कर्मचाऱ्यांचा 9% वरून दहा टक्के होणे अपेक्षित आहे.
पण ही वाढ ज्यावेळी महागाई भत्ता 50% क्रॉस करेल त्यावेळी लागू होऊ शकते अशी माहिती समोर येत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी 2024 मध्ये 50% क्रॉस होईल अशी शक्यता आहे. यामुळे घरभाडे भत्त्याचा लाभ देखील जानेवारी महिन्यानंतरच मिळू शकतो असा दावा काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये केला जात आहे.
यामुळे पुढील वर्षी अगदी सुरुवातीलाच सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी होणार आणि त्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु याबाबत अद्याप केंद्र शासनाकडून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
मीडिया रिपोर्ट मध्ये मात्र HRA अर्थातच घर भाडे भत्ता जानेवारी 2024 नंतर वाढवला जाऊ शकतो असे सांगितले जात आहे. यामुळे आता याबाबत केंद्र शासन केव्हा निर्णय घेणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहणार आहे.