Government Employee News : देशभरातील लाखों केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे जुलै महिन्यापासूनचा महागाई भत्ता लवकरच वाढणार आहे. जुलै महिन्यापासून आणखी चार टक्के डीए वाढ दिली जाणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मार्च महिन्यात केंद्र शासनाने महागाई भत्त्यात चार टक्के वाढ केली.
यानुसार महागाई भत्ता 42 टक्के एवढा बनला आहे. याआधी हा 38% एवढा होता. आता पुन्हा एकदा चार टक्के महागाई भत्ता वाढणार आहे. म्हणजे आता महागाई भत्ता 46% एवढा होणार असे सांगितले जात आहे. हा महागाई भत्ता जुलै महिन्यापासून अनुज्ञय केला जाणार आहे. निश्चितच शासनाने हा निर्णय घेतला तर देशभरातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
यासोबतच केंद्रशासन केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी एका भत्त्यात वाढ करणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा घर भाडे भत्ता देखील वाढणार आहे. घर भाडे भत्ता म्हणजेच एचआरए (HRA) हा कर्मचारी कोणत्या शहरात काम करतात यानुसार दिला जातो. हा भत्ता शहरानुसार X , Y आणि Z या श्रेणीमध्ये विभागण्यात आले आहे.
सध्या झेड श्रेणीमध्ये जे कर्मचारी मोडतात त्यांना मूळ वेतनाच्या 9% एवढा एच आर ए भत्ता मिळतो. दरम्यान शासन या भत्त्यात मोठी वाढ करणार आहे. यानुसार X श्रेणीमध्ये जे कर्मचारी मोडतात त्यांचा घर भाडे भत्ता हा तीन टक्क्यांनी वाढणार आहे. तसेच वाय श्रेणीमध्ये जे मोडतात त्यांचा घर भाडे भत्ता दोन टक्क्यांनी वाढणार आहे.
यासोबतच जे झेड श्रेणीमध्ये येतात त्यांचा घरभाडे भत्ता हा एक टक्क्यांनी वाढणार आहे. एकंदरीत जुलै महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे सोबतच घरभाडे भत्ता वाढीचा देखील लाभ या लोकांना दिला जाणार आहे. केंद्र शासनाने हा निर्णय घेतला तर निश्चितच याचा संबंधितांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे.