धक्कादायक ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांना 4% महागाई भत्ता वाढीचा लाभ उशिराने मिळणार, कारण काय?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Employee News : राज्य शासनाने गेल्या महिन्यात एक मोठा निर्णय घेतला. हा निर्णय राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी होता. या निर्णयानुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे.

पाचवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असलेल्याचा 16%, सहावा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असलेल्यांचा 9% आणि सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असलेल्यांचा 4 टक्के एवढा DA वाढविण्यात आला. जानेवारी महिन्यापासून ही वाढ अनुज्ञय करण्यात आली असून याचा लाभ रोखीने जून महिन्याच्या म्हणजेच पेड ईन जुलैच्या वेतनासोबत देण्याचा निर्णय झाला आहे.

शिवाय महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील संबंधित कर्मचाऱ्यांना वर्ग करण्याचे शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे. पण याचा निर्णय हा 30 जून 2023 रोजी झाला. यामुळे त्यावेळी अनेक राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन बिले तयार करण्यात आली होती.

अशा परिस्थितीत ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन बिल हा निर्णय निघण्यापूर्वी तयार झाली असतील त्यांना जून महिन्याच्या वेतनासोबत म्हणजे जुलै महिन्यात जें वेतन मिळणार होतं त्यासोबत हा लाभ मिळणार नाही असे सांगितले जात आहे.

यामुळे या कर्मचाऱ्यांना आता पुढील महिन्याच्या वेतनासोबत महागाई भत्त्याचा आणि महागाई भत्ता फरकाचा हा लाभ रोखीने दिला जाणार असल्याचे कोषागार कार्यालयाकडून सुचित करण्यात आली असल्याची माहिती एका मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून हाती आली आहे.

तसेच ज्याचं वेतन बिल तयार करण्यात आलेले नाही अशा सर्वांना जुन महिन्यांच्या वेतन देयकासोबत म्हणजे या जुलै महिन्यात जे वेतन मिळणार आहे त्यासोबतच वाढीव 4 टक्के डी.ए व महागाई भत्ता फरक रोखीने अदा करण्याचे निर्देश राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आले आहे.

वित्त विभागाने हे निर्देश निर्गमित केले आहेत. शिवाय जुन महिन्यांच्या वेतन देयकासोबत सातवा वेतन आयोगाचा 4 था हप्ता देखील अदा केला जाणार आहे. यासाठी देखील वित्त विभागाच्या माध्यमातून संबंधितांना निर्देश देण्यात आले असल्याची माहिती मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून हाती आली आहे.

Leave a Comment