Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. जर तुम्हीही सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी शासकीय सेवेत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच खास ठरणार आहे. खरंतर, सध्या जुलै महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किती वाढणार या संदर्भात चर्चा सुरू आहेत.
जानेवारी 2024 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46% दराने महागाई भत्ता दिला जात होता. मात्र यामध्ये चार टक्क्यांची वाढ झाली आहे. यानुसार हा महागाई भत्ता 50 टक्क्यांवर पोहोचला आहे.
विशेष म्हणजे जुलै 2024 पासूनचा महागाई भत्ता आणखी तीन टक्क्यांनी वाढणार आहे. याबाबतचा अधिकृत निर्णय सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात घेतला जाऊ शकतो. म्हणजेच सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात याबाबतचा अधिकृत जीआर जारी होणार आहे.
पण ही महागाई भत्ता वाढ जुलै महिन्यापासून लागू राहील म्हणजे जुलैपासून महागाई भत्ता 53% होणार आहे. दरम्यान, याबाबतचा अधिकृत जीआर निर्गमित होण्यापूर्वीच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
ती म्हणजे वित्त मंत्रालयाने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांकरीता सामान्य भविष्य निधी (GPF) आणि इतर तत्सम भविष्य निधी योजनांसाठी जुलै ते सप्टेंबर 2024 या तिमाहीसाठीचा व्याजदर वाढवला आहे. हा दर ७.१ टक्के एवढा करण्यात आला आहे.
म्हणजे या योजनांमध्ये जमा असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पैशांवर एक जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत 7.1% या इंटरेस्ट रेट ने व्याज मिळणार आहे. याबाबतचे परिपत्रक काल अर्थातच 3 जुलै 2024 ला केंद्र शासनाच्या वित्त विभागाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आले आहे.
सामान्य भविष्य निधी (केंद्रीय सेवा), योगदान भविष्य निधी (भारत), अखिल भारतीय सेवा भविष्य निधी, राज्य रेल्वे भविष्य निधी, सामान्य भविष्य निधी (संरक्षण सेवा) आणि भारतीय शस्त्रागार विभाग भविष्य निधी या योजनांसाठी हा नवीन दर लागू राहणार आहे.
एकंदरीत केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या या निर्णयामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि वर नमूद करण्यात आलेल्या योजना धारक लोकांना या वाढीव व्याजदरामुळे नक्कीच मोठा दिलासा मिळणार असून संबंधितांच्या माध्यमातून केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.
वित्त मंत्रालयाच्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या बचतीच्या रकमेवर सकारात्मक परिणाम होणार आहे. सदर नोकरदार मंडळी साठी ही नक्कीच एक मोठी भेट राहणार आहे.