Soybean Market Price : खरीप हंगाम 2024-25 ला नुकतीच सुरुवात झाली आहे. या खरीप हंगामात सोयाबीन आणि कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. सध्या राज्यातील शेतकरी बांधव खरीप हंगामातील पिकांमधील मशागतीची कामे करत आहेत. अशातच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायी बातमी समोर आली आहे. ज्यांच्याकडे गेल्या हंगामातील सोयाबीन अजूनही शिल्लक असेल त्यांच्यासाठी ही बातमी विशेष खास राहणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील अनेक बाजारात आज सोयाबीनच्या दरात थोडीशी वाढ झाली आहे. खरे तर सध्या फारच कमी शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक आहे. भाव वाढीच्या आशेने काही शेतकऱ्यांनी गेल्या हंगामातील सोयाबीन अजूनही साठवून ठेवला आहे.

Advertisement

दरम्यान या शेतकऱ्यांना सोयाबीन बाजारभावात झालेल्या सुधारणेचा थोडासा फायदा मिळणार आहे. तसेच, गेल्या हंगामातील सोयाबीनच्या दरात आता वाढ झाली असल्याने पुढील हंगामात सुद्धा सोयाबीनला चांगला दर मिळेल अशी आशा बळावली आहे.

बाजारभावात सुधारणा झाल्यामुळे सोयाबीन उत्पादकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दरम्यान आता आपण राज्यातील बाजारांमध्ये सोयाबीनला सध्या काय दर मिळतो या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

Advertisement

सोयाबीनला कोणत्या बाजारात मिळाला सर्वाधिक दर 

सिंदखेड राजा कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज सोयाबीनला किमान 4,600, कमाल 4,630 आणि सरासरी 4620 असा दर मिळाला.

Advertisement

अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज सोयाबीनला किमान साडेतीन हजार, कमाल 4560 आणि सरासरी 4413 असा दर मिळाला आहे. 

आंबेजोगाई कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज पिवळ्या सोयाबीनला कमाल 4,391, कमाल 4550 आणि सरासरी साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला.

Advertisement

गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज सोयाबीनला किमान साडेचार हजार, कमाल 4600 आणि सरासरी साडेचार हजार असा भाव मिळाला.

उमरेड कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज सोयाबीनला किमान 4000, कमाल 4560 आणि सरासरी 4300 असा भाव मिळाला आहे.

Advertisement

हिंगोली कानेगाव नाका कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज सोयाबीनला किमान 4310, कमाल 4460 आणि सरासरी 4385 असा भाव मिळाला आहे.

मुर्तीजापुर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज सोयाबीनला किमान 4220, कमाल 4455 आणि सरासरी 4365 असा भाव मिळाला आहे.

Advertisement

वनी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज सोयाबीनला किमान 3850, कमाल 4490 आणि सरासरी 4,200 असा भाव मिळाला आहे.

कळंब कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज सोयाबीनला किमान चार हजार तीनशे, कमाल 4524 आणि सरासरी 4421 असा भाव मिळाला आहे.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *