Government Employee News : केंद्र शासनाने मार्च 2023 मध्ये एक मोठा निर्णय घेतला. या निर्णयानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता मध्ये वाढ देण्यात आली. महागाई भत्ता अर्थातच डीए चार टक्के वाढवला. यानुसार सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA 42 टक्के एवढा बनला आहे.
याआधी हा भत्ता 38 टक्के एवढा होता. केंद्र शासनाने हा निर्णय घेतल्यानंतर देशातील अनेक राज्य सरकारांनी देखील त्यांच्या राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेतला आहे. यात महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्यांना देखील चार टक्के महागाई भत्ता वाढ देण्यात आली आहे.
यानुसार राज्यातील शासकीय सेवेत कार्यरत असलेल्यांना 42 टक्के एवढा महागाई भत्ता मिळत आहे. ही वाढ जानेवारी महिन्यापासून अनुज्ञय झाली असून याचा रोखीने लाभ जून महिन्याच्या वेतन सोबत देण्यात आला आहे. अशातच आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे केंद्र सरकारच्या सी पी एस ई अंतर्गत सार्वजनिक उपक्रम विभागातील कर्मचाऱ्यांचा जुलै महिन्यापासूनचा महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे. विभागाने ७ जुलैला यासंबंधीचा निर्णय घेतला आहे. यासाठी विभागाने शासन परिपत्रक निर्गमित केले आहे. या शासन परिपत्रकानुसार संबंधितांना महागाई भत्ता वाढीचा हा लाभ एक जुलै 2023 पासून मिळणार आहे.
किती वाढला महागाई भत्ता ?
सदर शासन निर्णयानुसार, केंद्र सरकारच्या सी पी एस ई अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक उपक्रम विभागातील ज्या कर्मचाऱ्यांचा मासिक मूळ पगार 3,500 रुपयांपर्यंत असेल त्यांचा महागाई भत्ता 701.9 टक्के म्हणजेच 15,428 रुपये एवढा होणार आहे. तसेच 3,501 ते 6,500 रुपये प्रति महिना मूळ वेतन मिळवणाऱ्याचा महागाई भत्ता 526.4 टक्के म्हणजे किमान 24,567 रुपये एवढा होणार आहे.
याशिवाय 6,500 रुपयांपेक्षा जास्त आणि 9,500 रुपयांपर्यंत मूळ वेतन असणाऱ्याचा महागाई भत्ता दर पगाराच्या 421.1 टक्के म्हणजे किमान 34,216 रुपयांचा राहणार आहे. निश्चितच या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. यामुळे केंद्र शासनाच्या या निर्णयाचे विविध स्तरावरून स्वागत केले जात आहे.