Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी आधीच केंद्र शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. खरंतर सध्या देशात नवरात्रोत्सवाचा सण साजरा केला जात आहे. पुढल्या महिन्यात दिवाळीचा देखील सण साजरा होणार आहे. 12 नोव्हेंबर पासून यावर्षी दिवाळीचा सण साजरा होणार आहे.
दरम्यान या सणासुदीच्या काळात केंद्र शासनाने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, केंद्रातील काही कर्मचाऱ्यांसाठी शासनाने दिवाळी बोनस जाहीर केला आहे. 17 ऑक्टोबर 2023 रोजी शासनाने याबाबतचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार, केंद्रातील ग्रुप बी आणि ग्रुप सी श्रेणीतील कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस दिला जाणार आहे. ग्रुप बी आणि ग्रुप सी संवर्गातील जे कर्मचारी कोणत्याही उत्पादकता लिंक्ड बोनस योजनेंतर्गत समाविष्ट नाहीत त्या कर्मचाऱ्यांना हा बोनस दिला जाणार आहे. या संबंधित नोकरदारांना त्यांच्या तीस दिवसाच्या पगारा इतका नॉन प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस केंद्र शासनाने जाहीर केला आहे.
या अंतर्गत या संबंधित कर्मचाऱ्यांना 7,000 रुपयांपर्यंतचा दिवाळी बोनस यावेळी जाहीर करण्यात आला आहे. यामुळे सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचा आशावाद आता व्यक्त होत आहे.
केंद्रीय निमलष्करी दल आणि सशस्त्र दलातील पात्र कर्मचाऱ्यांनाही या बोनसचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. पण हा बोनस देतांना काही अटी देखील लावण्यात आल्या आहेत. यानुसार, ३१ मार्च २०२३ पर्यंत सेवेत आहेत आणि २०२२-२३ या वर्षात किमान ६ महिने काम केले आहे अशा कर्मचाऱ्यांनाचा हा बोनस दिला जाईल असे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
निश्चितच, केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे या संबंधित कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणाऱ आहे. दरम्यान केंद्रातील मोदी सरकारने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून देखील या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.
याशिवाय काल अर्थातच 18 ऑक्टोबर 2023 रोजी केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता 4% वाढवण्याचा देखील निर्णय घेतला आहे. आतापर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के एवढा महागाई भत्ता दिला जात होता. यामध्ये आता चार टक्के वाढ करण्याचा निर्णय झाला आहे. म्हणजेच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना 46 टक्के एवढा महागाई भत्ता मिळणार आहे.
विशेष म्हणजे ही वाढ जुलै महिन्यापासून लागू केली जाणार आहे. याचा रोखीने लाभ मात्र ऑक्टोबर महिन्याच्या वेतनासोबत म्हणजे जे वेतन नोव्हेंबर महिन्यात हातात मिळेल त्यासोबत दिले जाणार आहे.
तसेच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्याची महागाई भत्ता थकबाकी देखील संबंधित कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना यावेळी दिली जाणार आहे. या दोन्ही निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.