शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! केंद्र शासनाने ‘या’ रब्बी पिकांच्या हमीभावात केली भरघोस वाढ, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News : सध्या देशात खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या काही दिवसात संपूर्ण देशभरात रब्बी हंगामातील पीक पेरणीला सुरुवात होणार आहे. अशातच, देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची आणि सणासुदीच्या काळात दिलासादायक अशी बातमी समोर येत आहे.

खरंतर सध्या संपूर्ण देशभरात नवरात्रोत्सवाचा सण मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा होत आहे. नवरात्रोत्सवाच्या सणामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. अशा या आनंददायी वातावरणामध्ये केंद्र शासनाने देशातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

केंद्र शासनाने देशातील शेतकऱ्यांना नवरात्रोत्सवाचे एक खास गिफ्ट दिले आहे. ते म्हणजे केंद्र शासनाने रब्बी हंगामातील पिकांच्या एमएसपीत म्हणजेच हमीभावात घसघशीत अशी वाढ करण्याचा मोठा निर्णय कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे.

केंद्र शासनाने काल अर्थातच 18 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत सहा रब्बी पिकांच्या एमएसपी मध्ये वाढ केली आहे. केंद्र शासनाने या रब्बी पिकांच्या एमएसपी मध्ये दोन टक्क्यांपासून ते सात टक्क्यांपर्यंतची वाढ केली आहे.

यामुळे सणासुदीच्या दिवसात शेतकऱ्यांना एक मोठी भेट मिळाली असल्याचे सांगितले जात आहे. आता आपण केंद्र शासनाने कोणत्या पिकांच्या एमएसपीत किती वाढ केली याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

कोणत्या पिकाच्या एमएसपीत किती वाढ ?

काल केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत केंद्र शासनाने बार्ली, गहू, हरभरा, मसूर, मोहरी आणि सूर्यफूल या सहा पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ केली आहे. केंद्र शासनाने गव्हाच्या एमएसपीत प्रतिक्विंटल 150 रुपयांची वाढ केली असून आगामी रब्बी हंगामात गव्हाला 2,275 रुपये प्रति क्विंटल एवढी एमएसपी दिली जाणार आहे.

बार्लीच्या एमएसपी 115 रुपयांची वाढ केली असून या नवीन हंगामात बार्लीला 1,850 रुपये प्रति क्विंटल एवढी एमएसपी दिली जाणार आहे. हरभऱ्याच्या एमएसपीमध्ये 105 रुपयांची वाढ करण्यात आली असून आता हरभऱ्याला प्रतिक्विंटल 5,440 रुपये प्रति क्विंटल एवढी एमएसपी दिली जाणार आहे.

मसूरच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 425 रुपयांची वाढ करण्यात आली असून आता नवीन हंगामात मसूरला 6425 रुपये प्रति क्विंटल एवढी एमएसपी दिली जाणार आहे. मोहरीच्या एमएसपी केंद्र शासनाने आता 200 रुपये प्रति क्विंटल एवढी वाढ केली आहे.

आता या नवीन हंगामात मोहरीला 5650 रुपये प्रति क्विंटल एवढी एमएसपी दिली जाणार आहे. याशिवाय सूर्यफुलच्या एमएसपीत 150 रुपये प्रति क्विंटल एवढी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता सूर्यफूलला 5,800 प्रतिक्विंटल एवढी एमएसपी दिली जाणार आहे.

Leave a Comment