Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. जर तुमच्या कुटुंबातून कोणी सरकारी सेवेत कार्यरत असेल किंवा तुम्ही स्वतः सरकारी सेवेत असाल तर आजची ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच वाचायला हवी.
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या नवीन निर्णयानुसार आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना अधिकृत प्रवास करतांना म्हणजे सरकारी दौरा, ट्रेनिंग प्रोग्राम, ट्रान्सफर किंवा रिटायरमेंट या करीता प्रवास करताना मोठी सुविधा मिळणार आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता वंदे भारत एक्सप्रेस आणि हमसफर एक्सप्रेस ने अधिकृत प्रवास करता येणार आहे. याआधी वंदे भारत एक्सप्रेस आणि हमसफर एक्सप्रेस ने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना शासकीय कामांसाठी या गाडीने प्रवास करता येत नव्हता.
शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेस मध्ये प्रवास करताना केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ज्या अटी आणि शर्ती लावून देण्यात आल्या आहेत त्याच अटी आणि शर्ती वंदे भारत आणि हमसफर एक्सप्रेसने प्रवास करताना लागू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की याआधी सरकारी कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग, ट्रान्सफर, ट्रेनिंग प्रोग्राम आणि रिटायरमेंट साठी वंदे भारत आणि हमसफर एक्सप्रेसने प्रवास करता येत नव्हता. मात्र आता केंद्र शासनाने या एक्सप्रेस गाड्यांमध्ये देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी अनुमती दिली आहे.
यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग, ट्रान्सफर, रिटायरमेंट किंवा एखादा सरकारी दौरा असल्यास वंदे भारत तसेच हमसफर एक्सप्रेसने देखील प्रवास करता येणे शक्य होणार आहे. याशिवाय केंद्रीय वित्त मंत्रालयाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तेजस एक्सप्रेसने प्रवास करताना काही नियम आणि शर्ती लागू केल्या आहेत.
यानुसार, सरकारी कर्मचाऱ्यांना केवळ ट्रेनिंग, ट्रान्सफर, रिटायरमेंटसाठी तेजस एक्सप्रेस ने प्रवास करता येणार आहे. निश्चितच केंद्र शासनाच्या वित्त विभागाने घेतलेला हा निर्णय देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी फायद्याचा राहणार आहे.