येत्या 13 दिवसात सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार गुड न्यूज ! महागाई भत्ता कितीने वाढणार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government Employee News : देशातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे येत्या 13 दिवसांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कितीने वाढू शकतो याबाबतची नवीन आकडेवारी 31 जानेवारीला समोर येणार आहे.

यामुळे सध्या कर्मचारी 31 जानेवारीची आतुरतेने वाट पाहत आहेत. या दिवशी कर्मचाऱ्यांना या नव्या वर्षाची पहिली गुड न्यूज मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या दिवशी महागाई भत्त्याची (DA) नवीन आकडेवारी जाहीर केली जाणार आहे. यावरून मग केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी 2024 पासून किती महागाई भत्ता मिळणार हे निश्चित होणार आहे.

जसं की आपल्या ठाऊकचं आहे की, सध्या महागाई भत्ता हा 46% एवढा आहे. जुलै 2023 पासून महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्यात आला असून तेव्हापासून 46 टक्के दराने डीए दिला जात आहे.

अशा परिस्थितीत जानेवारी महिन्यापासून किती DA मिळणार हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे. डिसेंबरचे AICPI निर्देशांक आकडे अजून जाहीर झालेले नाहीत. 31 जानेवारीला ही आकडेवारी समोर येणार आहे.

त्यानंतर मग खऱ्या अर्थाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी 2024 पासून किती महागाई भत्ता मिळेल याबाबतची निश्चिती होणार आहे.

पण, आत्तापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आणखी चार टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजेच महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो.

पण जर निर्देशांकात मोठी वाढ झाली अन निर्देशांक जानेवारीमध्ये 50.52 अंकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. असे झाल्यास महागाई भत्ताही ५१ टक्के असू शकतो.

मात्र काही जाणकार लोक सध्याचा ट्रेंड पाहिला तर महागाई भत्त्यात चार टक्के वाढ होईल असे बोलत आहेत. मात्र जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता किती वाढणार हे 31 जानेवारीनंतरचं क्लिअर होऊ शकणार आहे.

तथापि आगामी निवडणुकांचा काळ पाहता केंद्र शासनाच्या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता संदर्भात सकारात्मक निर्णय होईल आणि कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचे काम होईल असा दावा केला जात आहे.

Leave a Comment