सरकारी कर्मचाऱ्यांना येणार अच्छे दिन ! ‘या’ महत्वाच्या भत्त्यात 3 वर्षानंतर होणार वाढ, पगार दुपटीने वाढणार, पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government Employee News : देशभरातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी त्यांच्या पगारासंदर्भात आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच मोदी सरकार एक मोठी भेट देणार आहे.

ती म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता घरभाडे भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे. दरम्यान आज आपण केंद्रीय कर्मचाऱ्यांना घर भाडे भत्ता म्हणजेच एचआरए वाढीचा लाभ केव्हा मिळणार आणि किती एचआरए वाढणार याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

किती वाढणार HRA

एका मीडिया रिपोर्ट मधून समोर आलेल्या माहितीनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा HRA तीन टक्के एवढा वाढणार आहे. 2021 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा घर भाडे भत्ता वाढवण्यात आला होता त्यावेळी एक्स श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना 27% वाय श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना 18% आणि झेड श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना नऊ टक्के एवढा घरभाडे भत्ता देण्याचा निर्णय झाला.

तेव्हापासून मात्र घर भाडे भत्त्यात वाढ झालेली नाही. पण आता यामध्ये वाढ होणार अशी शक्यता आहे. घरभाडे भत्त्यात गेल्या वेळी वाढ झाली तेव्हा महागाई भत्ता 25 टक्के एवढा होता. दरम्यान आता घर भाडे भत्त्यात 1 ते 3 टक्क्यांपर्यंतची वाढ होणार आहे. यानुसार एक्स श्रेणीमधील कर्मचाऱ्यांचा HRA 27% वरून 30 टक्के, वाय श्रेणीमधील कर्मचाऱ्यांचा 18 टक्क्यावरून 20 टक्के आणि झेड श्रेणीमधील कर्मचाऱ्यांचा HRA 9% वरून दहा टक्के होणार आहे.

केव्हा वाढणार HRA ?

केंद्र शासनाने 2016 मध्ये काढलेल्या एका ज्ञापणानुसार, महागाई भत्ता सोबतच घरभाडे भत्त्यात देखील वेळोवेळी सुधारणा केली जाणार आहे. यानुसार, महागाई भत्ता ज्यावेळी पंचवीस टक्के झाला त्यावेळी घरभाडे भत्त्यात वाढ करण्यात आली. आता महागाई भत्ता 50 टक्के झाल्यानंतर पुन्हा एकदा घरभाडे भत्ता वाढवला जाणार आहे.

दरम्यान, महागाई भत्ता म्हणजेच डीए हा 2024 मध्ये 50% क्रॉस करणार आहे. यामुळे घर भाडे भत्ता देखील पुढील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

X, Y आणि Z श्रेणी काय आहे

HRA मध्ये X, Y, Z श्रेणी काय आहे? असा प्रश्न अनेकांकडून विचारला जातो. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, जे कर्मचारी 50 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात कार्यरत असतात त्या कर्मचाऱ्यांचा X श्रेणीत समावेश केला जातो. यातील कर्मचाऱ्यांना सध्या 27% एवढा HRA मिळत आहे.

तसेच वाय श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना सध्या 18% आणि झेड श्रेणी मधील कर्मचाऱ्यांना नऊ टक्के HRA मिळत आहे. यात पुढील वर्षी एक टक्क्यापासून ते तीन टक्क्यांपर्यंतची वाढ केली जाणार आहे. 

Leave a Comment