सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! दिवाळीच्या पूर्वीच सरकार घेणार हा मोठा निर्णय, पगारात होणार हजारो रुपयांची वाढ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government Employee News : भारतात दरवर्षी दिवाळीचा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा होतो. दिवाळी सणाला सर्वत्र उत्साहाचे वातावरण राहते. या सणाला नवनवीन वस्त्रे, सोन्या-चांदीचे अलंकार, आभूषण खरेदी केले जातात. दरम्यान यंदाचा हा आनंदाचा आणि उल्हासाचा सण देशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूपच खास राहणार आहे.

कारण की यंदा दिवाळीपूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट मिळणार आहे. खरंतर यावर्षी 12 नोव्हेंबरला दिवाळीचा सण साजरा होणार आहे. दरम्यान या सणाच्या पूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेट मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्ता वाढीची भेट दिली जाणार आहे.

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहेत. मात्र आता यामध्ये आणखी चार टक्के वाढ होणार आहे. अर्थातच महागाई भत्ता 46% एवढा होणार आहे. विशेष म्हणजे ही वाढ जुलै महिन्यापासून लागू केली जाणार आहे. तसेच याबाबतचा निर्णय या चालू महिन्यात केव्हाही घेतला जाऊ शकतो असे सांगितले जात आहे.

म्हणजेच ऑक्टोबर महिन्याच्या वेतनासोबत जे की नोव्हेंबर महिन्यात मिळेल त्यासोबत महागाई भत्ता वाढीचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांना मिळू शकतो. याचाच अर्थ दिवाळीच्या पूर्वी जो पगार मिळेल त्या पगारासोबत महागाई भत्ता वाढीचा लाभ संबंधितांना मिळणार आहे.

विशेष असे की, सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचा महागाई भत्ता थकबाकीचा देखील लाभ मिळणार आहे. यामुळे निश्चितच दिवाळी सणाच्या पूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा मिळणार असे चित्र तयार होत आहे.

याबाबत, मात्र केंद्र शासनाकडून अद्याप कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. परंतु आगामी सणासुदीचा हंगाम पाहता सरकार कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय या चालू महिन्यात घेण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे आता केंद्रशासन हा निर्णय या चालू ऑक्टोबर महिन्यातच घेते का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

Leave a Comment