Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आता वाढू शकतात.
कारण की, केंद्र शासन लवकरच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ करणार आहे. ह्या फॅक्टर मध्ये वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात वाढ होणार असे सांगितले जात आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या स्थितीला केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 2.57 पटीने फिटमेंट फॅक्टरचा लाभ मिळतोय मात्र हा फॅक्टर आता 3.68 पट पर्यंत वाढणार आहे.
यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात म्हणजेच बेसिक सॅलरीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अद्याप याबाबत सरकारने कोणतीच माहिती दिलेली नाही. परंतु काही मीडिया रिपोर्ट्समध्ये याबाबत दावा करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट मध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर आता लवकरच 3.68 पट पर्यंत वाढणार आहे.
यामुळे संबंधितांचे मुळवेतन प्रभावित होणार असून यामध्ये विक्रमी वाढ होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आज आपण फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ झाली तर मूळ वेतनात किती वाढ होऊ शकते याबाबत थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
किती वाढणार मूळ वेतन
फिटमेंट फॅक्टर मूळ वेतनाशी निगडित आहे. यात वाढ झाली तर मूळ वेतन देखील वाढते. आता फिटमेंट फॅक्टर 2.57 पट आहे. यानुसार आता कर्मचाऱ्यांना किमान 18000 रुपये एवढे मुळवेतन मिळत आहे. पण यात 3.68 पट पर्यंत वाढ झाली तर कर्मचाऱ्यांचा किमान पगार हा 18000 वरून थेट 26000 पर्यंत जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या किमान पगारात 8 हजाराची वाढ होणार आहे. याव्यतिरिक्त, जुलै महिन्यापासून महागाई भत्ता देखील वाढवला जाणार आहे. जुलै महिन्यापासून आणखी चार टक्के महागाई भत्ता वाढणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. सध्या 42 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात असून यामध्ये चार टक्के वाढ झाली तर महागाई भत्ता 46% एवढा होणार आहे.