Government Employee News : वर्ष 2023 हे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूपच खास ठरले आहे. सालाबादाप्रमाणे या चालू वर्षातही सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोनदा वाढवण्यात आला आहे.
यंदा सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आठ टक्क्यांनी वाढला आहे. पहिल्या सहामाहीत चार टक्के आणि दुसऱ्या सहामाहीत चार टक्के अशी एकूण आठ टक्क्यांची वाढ झाली आहे.
यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. आता हे चालू वर्षे येत्या काही दिवसात संपणार आहे. यानंतर नवीन वर्षाला सुरुवात होईल.
दरम्यान येणारे नवीन वर्षे हे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी खास राहील आणि येत्या नवीन वर्षात अर्थातच वर्ष 2024 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी दोनदा महागाई भत्ता वाढ दिली जाणार आहे.
मीडिया रिपोर्ट नुसार, पुढील वर्षी पहिल्या सहामाहीत महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46% एवढा महागाई भत्ता मिळत आहे.
यामध्ये आणखी 4 टक्के एवढी वाढ होऊ शकते असे सांगितले जात आहे. जर असे झाले तर महागाई भत्ता 50 टक्क्यांवर जाणार आहे. तसेच जानेवारी 2024 पासून ही वाढ लागू राहणार आहे.
दरम्यान जर महागाई भत्ता 50 टक्क्यांपेक्षा अधिक झाला तर महागाई भत्ता 0 होईल आणि महागाई भत्त्याची रक्कम ही मूळ वेतनात लागू केली जाईल असे सांगितले जात आहे.
यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होणार आहे. जर समजा महागाई भत्त्याची रक्कम मुळ वेतनात जोडण्यात आली तर किमान अठरा हजार रुपये पगार असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 9,000 रुपयाची वाढ होऊ शकते.
यामुळे निश्चितच संबंधित सरकारी नोकरदार मंडळीचा पगार हा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे येणारे नवीन वर्ष सरकारी नोकरदारांसाठी खूपच खास राहील असे बोलले जात आहे.
तथापि शासनाच्या माध्यमातून याबाबत कोणतीच अधिकृत अपडेट समोर आलेली नाही. यामुळे आता शासन खरंच असा निर्णय घेते का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.