कर्मचाऱ्यांची कोरोना काळापासूनची मागणी अखेर होणार पूर्ण ! हा लाभ मिळणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government Employee News : केंद्र शासनाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी आठवा वेतन आयोगाबाबत एक महत्त्वाचे अपडेट दिले आहे. केंद्र शासनाने सध्या स्थितीला शासन दरबारी आठवा वेतन आयोग लागू करणे बाबत कोणताच प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे स्पष्ट केले आहे.

केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या सचिवांनीच हे स्पष्टीकरण दिले आहे. खरे तर, गेल्या काही दिवसांपासून मीडिया रिपोर्ट मध्ये सातत्याने आठवा वेतन आयोग आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लागू होऊ शकतो अशा चर्चा पाहायला मिळत आहेत.

दरम्यान याबाबत वित्त मंत्रालय सचिव टी वी सोमनाथन यांनी सध्या स्थितीला याबाबत केंद्र शासन दरबारी असा कोणताच प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे स्पष्ट केले आहे.

विशेष बाब म्हणजे केंद्रीय वित्त राज्यमंत्री केंद्र शासन दरबारी आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी सरकार सध्या स्थितीला विचार करत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांनी मात्र शासनाच्या या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

अशातच आता काही मीडिया रिपोर्ट मध्ये सरकार आगामी नवीन वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी एक मोठा निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांची कोरोना काळापासूनची प्रलंबित मागणी आता पूर्ण होणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार केंद्र शासन कोरोना काळात रखडलेली 18 महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी जमा करणार आहे.

याबाबत केंद्र शासनाने अजूनही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र काही मीडिया रिपोर्ट मध्ये असा दावा करण्यात आला आहे.

आगामी वर्षात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका राहणार असल्याने तसेच महाराष्ट्राचे देशातील काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार असल्याने याबाबत केंद्रातील मोदी सरकार सकारात्मक निर्णय घेईल असा दावा केला जात आहे.

याबाबत केंद्र शासनाने कोणतीच माहिती दिलेली नसली तरी देखील निवडणुकांचे वर्ष पाहता याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाऊ शकतो असे मत जाणकार लोकांच्या माध्यमातून व्यक्त केले जात आहे.

Leave a Comment