Government Employee News : जर तुम्ही सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी शासकीय सेवेत असेल, अथवा तुमच्या मित्र परिवारातून कोणी सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी आहे.
उद्या अर्थातच 1 फेब्रुवारी 2024 ला केंद्रातील मोदी सरकार आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम बजेट सादर करणार आहे. या शेवटच्या अंतरिम बजेटमध्ये शेतकरी, सरकारी कर्मचार, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, करदाता इत्यादी वर्गांसाठी निर्णय घेतले जातील असा अंदाज आहे.
विशेषता सरकारी कर्मचाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी मोदी सरकारच्या या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटच्या बजेटमध्ये अनेक मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात आता 8,000 पर्यंतची वाढ होऊ शकते. याबाबतचा निर्णय बजेटमध्ये होणार आहे.
उद्या सादर होणाऱ्या बजेटमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांची एक मोठी मागणी पूर्ण होऊ शकते. खरंतर गेल्या अनेक महिन्यांपासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ झाली पाहिजे ही मागणी केली जात आहे.
यासाठी विविध संघटनांनी शासनाकडे पाठपुरावा केला आहे. शासनाकडे या आपल्या मुख्य मागणीसाठी वेळोवेळी निवेदने सादर झाली आहेत.
आता मात्र यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात फिटमेंट फॅक्टर वाढीबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे बजेट सादर झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत.
या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी फिटमेंट फॅक्टर वाढवण्याबाबत सकारात्मक निर्णय होणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2.57 पट फिटमेंट फॅक्टर लागू आहे.
मात्र लवकरच हा फॅक्टर 3.68 पट पर्यंत वाढणार अशी आहे. जर असे झाले तर सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन देखील वाढणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18 हजार रुपये एवढे आहे.
मात्र फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास हे वेतन 26,000 पर्यंत वाढणार आहे. अर्थातच कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 8000 ची वाढ होण्याची शक्यता आहे.