48 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात मिळणार मोठे गिफ्ट ! बेसिक सॅलरीत होणार तब्बल 8000 ची वाढ, सरकार घेणार मोठा निर्णय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government Employee News : येत्या पाच दिवसात 2023 या वर्षाचे समापन होणार आहे. यानंतर नवीन वर्षाला सुरुवात होईल. अशातच मात्र देशभरातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

खरतर या चालू वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षीप्रमाणे दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला. 2023 च्या पहिल्या सहामाहीत चार टक्के आणि दुसऱ्या सहामाहीत चार टक्के असा एकूण आठ टक्के महागाई भत्ता वाढला.

यामुळे सरकारी नोकरदार मंडळीच्या पगारात मोठी वाढ झाली. दरम्यान आगामी वर्ष अर्थातच 2024 हे वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अधिक खास आणि आनंदाचे राहणार असा दावा केला जात आहे.

याचे कारण म्हणजे पुढील वर्षी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका राहणार आहेत. शिवाय महाराष्ट्रात विधानसभेच्या देखील निवडणुका रंगणार आहेत.

अशा परिस्थितीत, सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार एक फेब्रुवारी 2024 रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ करणार आहेत.

यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारात म्हणजेच मूळ पगारात वाढ होणार आहे. अंतरिम अर्थसंकल्पानंतर देशात सार्वत्रिक निवडणुका जाहीर होतील.

अशा परिस्थितीत सरकारी कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी अर्थसंकल्पात ही घोषणा केली जाऊ शकते. सध्या फिटमेंट फॅक्टर 2.57 टक्के आहे.

जर एखाद्याचा ग्रेड पे 4200 रुपये असेल तर त्याचे मूळ वेतन 15,500 रुपये असेल. या प्रकरणात, कर्मचार्‍याचा एकूण पगार रु. 15,500×2.57 म्हणजेच 39,835 रु. एवढा आहे.

फिटमेंट फॅक्टर 3.68 पर्यंत वाढवावा, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. असे झाल्यास मूळ वेतन 18,000 रुपयांवरून 26,000 रुपये होणार आहे. म्हणजे मूळ पगारात जवळपास आठ हजार रुपयांची वाढ होणार आहे.

Leave a Comment