आंनदाची बातमी ! ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांच्या दोन प्रलंबित मागण्या होणार पूर्ण, पगारात होणार मोठी वाढ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government Employee News : आगामी वर्ष अर्थातच 2024 हे निवडणुकीचे वर्ष राहणार आहे. पुढील वर्षी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. शिवाय महाराष्ट्रासह देशातील काही प्रमुख राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका देखील रंगणार आहेत.

भारतीय निवडणूक आयोगाने तसेच संकेतच दिले आहेत. अशा परिस्थितीत आगामी निवडणुकीत मतदाराजांनी पुन्हा आपल्यालाच मत द्यावे यासाठी सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांना साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

याशिवाय विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच कंबर कसली आहे. अशातच आता देशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देशातील सरकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी लवकरच दोन महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. सरकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 15 ते 20 टक्के एवढी वाढ होणार आहे.

तसेच या कर्मचाऱ्यांच्या कामाचा आठवडा हा पाच दिवसांचा होण्याची शक्यता आहे. याबाबतचा प्रस्ताव देखील तयार झाला आहे.

इंडियन बँक असोसिएशन याबाबतचा प्रस्ताव तयार केला असून सध्या या प्रस्तावावर इंडियन बँक असोसिएशन आणि बँक युनियनच्या मध्यात चर्चा सुरू आहे. दरम्यान यावर लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

खरे तर बँक युनियनच्या माध्यमातून गेल्या काही दिवसापासून पगारवाढीसाठी आणि कामाचा आठवडा पाच दिवसाचा करावा यासाठी सातत्याने असोसिएशन कडे पाठपुरावा केला जात आहे.

आता हा पाठपुरावा लवकरच यशस्वी होणार असा अंदाज आहे. कारण की इंडियन बँक असोसिएशनने याबाबतचा प्रस्ताव आता तयार केला आहे. सध्या या प्रस्तावावर असोसिएशन आणि बँक युनियन यांच्यात होत असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे.

तसेच चर्चेअंती हा प्रस्ताव केंद्र शासनाच्या अर्थ मंत्रालयाकडे सादर होणार आहे. आगामी निवडणुकांचा काळ पाहता अर्थ मंत्रालय देखील या प्रस्तावाला लवकरात लवकर हिरवा कंदील दाखवणार असे बोलले जात आहे.

यामुळे देशभरातील सरकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आणि कामाचा आठवडा पाच दिवसांचा होणार अशा चर्चा प्रसार माध्यमांमध्ये पाहायला मिळत आहेत.

Leave a Comment