Government Employee News : जर तुम्हीही सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी शासकीय सेवेत सेवा बजावत असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, मार्च 2023 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना चार टक्के डीए वाढीचा लाभ देण्यात आला.
जानेवारी महिन्यापासून ही वाढ अनुज्ञय करण्यात आली. यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 42 टक्के एवढा झाला आहे. याआधी हा 38% एवढा होता. अशातच आता जुलै महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA आणखी 4% वाढणार आहे. म्हणजेच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 46 टक्के एवढा होणार आहे.
यामुळे निश्चितच सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असे सांगितले जात आहे. अशातच मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठी गुड न्यूज मिळणार आहे. ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात वाढ होणार आहे.
याआधी घरभाडे भत्ता म्हणजेच एचआरए 2021 मध्ये वाढविण्यात आला होता. त्यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 25 टक्के एवढा होता. आता महागाई भत्ता जानेवारी 2024 पासून 50 टक्के होणार अशी शक्यता आहे. त्यावेळी पुन्हा एकदा घर भाडे भत्ता वाढवला जाणार आहे.
किती घर भाडे भत्ता वाढणार?
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, घर भाडे भत्ता हा तीन श्रेणीनुसार विभागाल जातो. कर्मचाऱ्यांना शहरानुसार एक्स श्रेणी, वाय श्रेणी आणि झेड श्रेणी यानुसार घरभाडे भत्ता विभागण्यात आला आहे. झेड श्रेणीमध्ये जें कर्मचारी येतात त्यांना 8% घर भाडे भत्ता मिळत आहे.
वाय श्रेणीमध्ये जे कर्मचारी येतात त्यांना 16% आणि एक्स श्रेणीमध्ये जे कर्मचारी येतात त्यांना 24% घरभाडे भत्ता मिळत आहे. आता या HRA मध्ये तीन टक्केपर्यंत वाढ होणार आहे. एक्स श्रेणी मधील कर्मचाऱ्यांचा HRA तीन टक्के, वाय श्रेणी मधील कर्मचाऱ्यांचा दोन टक्के आणि झेड श्रेणीमधील कर्मचाऱ्यांचा एक टक्के घर भाडे भत्ता वाढणार आहे.