जुलै महिन्यात फक्त ‘या’ तारखांनाच पडणार पाऊस ! पंजाबराव डख यांच्या नवीन अंदाजाची रंगतेय सध्या सर्वत्र चर्चा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh Havaman Andaj : जून महिना संपला मात्र तरीही महाराष्ट्रात अजूनही समाधानकारक असा पाऊस झालेला नाही. जून महिन्यात राज्यात पावसाने मोठी उघडीप दिली आहे. यामुळे राज्यातील खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. विशेष म्हणजे आता जुलै महिना सुरू होऊन जवळपास चार दिवस झालेत तरीही राज्यात पावसाची तीव्रता वाढलेली नाही.

सध्या महाराष्ट्रातील कोकण आणि घाटमाथ्यावर पाऊस पडत आहे. परंतु मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा तसेच विदर्भात पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर आहेत. पण आजपासून राज्यात जोरदार पावसाला सुरुवात होणार असा अंदाज भारतीय हवामान विभागाने नुकताच व्यक्त केला आहे.

4 जुलैपासून राज्यात पावसाचा जोर वाढेल, विशेष बाब म्हणजे आजपासून मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आयएमडीच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांनी देखील जुलै महिन्यात कोणत्या तारखांना पाऊस पडणार याबाबत एक महत्त्वाचे अपडेट दिले आहे.

डख यांनी सांगितले की ज्यावेळी कोकण, मुंबई, पुणे, नासिक या भागात म्हणजेच घाटमाथ्याच्या परिसरात संततधार पाऊस सुरू असतो त्यावेळी उर्वरित राज्यात पावसाची उघडीप राहते. यामुळे सध्या कोकण घाटमाथ्यावर तसेच मुंबई, पुणे, नाशिक या परिसरात संततधार पाऊस सुरू असल्याने राज्यातील उर्वरित भागात जोरदार वारे वाहत आहेत.

मात्र आता ही परिस्थिती आजपासून अर्थातच चार जुलैपासून बदलणार असून चार जुलै पासून ते नऊ जुलै पर्यंत राज्यातील मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे नऊ तारखेपर्यंत राज्यातील बहुतांशी भागातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण होणार असं भाकीतही त्यांनी वर्तवल आहे.

तसेच राज्यात 13 जुलै ते 17 जुलै दरम्यान देखील जोरदार पावसाची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाची अतिशय आतुरतेने वाट पाहिली जात होती आणि आता आजपासून पावसाचा जोर वाढणार असा अंदाज आहे यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळणार आहे. 

Leave a Comment