Government Employee News : येत्या काही महिन्यात लोकसभा निवडणुका सुरू होणार असून या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून समाजातील सर्व घटकांसाठी विविध कल्याणकारी आणि कौतुकास्पद निर्णय घेतले जात आहेत.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी देखील शासनाकडून विविध निर्णय घेतले जात आहेत. नुकतेच केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ केली आहे. जानेवारी महिन्यापासून चार टक्के DA वाढ लागू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जुलै महिन्यापासून देखील महागाई भत्ता वाढ लागू केली जाणार आहे.
जुलै महिन्यापासून 4% महागाई भत्ता वाढ लागू केली जाणार आहे. याचा निर्णय लवकरच घेतला जाणार अशी आशा आहे. अशातच आता कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक मोठी आणि अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे आठवा वेतन आयोग संदर्भात.
मिळालेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांना लवकरच आठवा वेतन आयोगाची भेट मिळणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सरकारी कर्मचाऱ्यांना दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोगाची भेट दिली जाते. याआधी सरकारी कर्मचाऱ्यांना 2016 मध्ये सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता.
याचाच अर्थ आता 2026 मध्ये आठवा वेतन आयोग लागू केला जाऊ शकतो. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हा नवीन वेतन आयोग वेळेत लागू व्हावा यासाठी सरकारकडे मागणी केली जात आहे. अशातच आता या नवीन वेतन आयोगासंदर्भात वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी एक मोठी अपडेट दिली आहे.
भागवत कराड यांनी लोकसभेतील एका चर्चेदरम्यान नवीन वेतन आयोगाची अर्थातच आठवा वेतन आयोगाची स्थापना पुढील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये होणार अशी माहिती दिली आहे. अर्थातच 2024 मध्ये नवीन वेतन आयोगाची स्थापना होणार आणि त्यापुढे दोन वर्षात हा नवीन वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होणार असे चित्र तयार होत आहे.
खरंतर सध्या सातवा वेतन आयोगांतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना 2.57 पट फिटमेंट फॅक्टर नुसार वेतन दिले जात आहे. मात्र आता आठवा वेतन आयोग लागू झाला तर कर्मचाऱ्यांना 3.58 पट फिटमेंट फॅक्टर नुसार वेतन मिळणार आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, 3.68% फिटनेस ट्रॅक्टर प्रमाणे केंद्रीय कर्मचाऱ्यांच किमान मूळ वेतन 18 हजार रुपये वरून वाढून 26 हजार रुपये इतक होणार आहे.
तसेच राज्य कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 15000 वरून 21000 होणार आहे. निश्चितच, आठवा वेतन आयोग लागू झाला तर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होणार आहे. यामुळे आता हा वेतन आयोग प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना केव्हा बहाल केला जातो याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.
मात्र या नवीन वेतन आयोगाबाबत सरकार दरबारी हालचाली वाढल्या आहेत. यामुळे दर दहा वर्षानंतर लागू होणारा नवीन वेतन आयोग यावेळी देखील नियमित वेळेत म्हणजेच 2026 पर्यंत लागू होऊ शकतो असा आशावाद व्यक्त होत आहे.