Government Employee : जर तुम्ही सरकारी कर्मचारी म्हणून शासकीय सेवा बजावत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी सरकारी नोकरदार असेल तर ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास आहे.
खरे तर वर्ष 2023 सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूपच खास राहिली आहे. या चालू वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला आहे. यावर्षी एकूण आठ टक्के महागाई भत्ता वाढला आहे.
यामुळे सदर नोकरदार मंडळीच्या पगारात चांगलीच वाढ झाली आहे. दरम्यान येणारे नवीन वर्ष सुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. नवीन वर्षात त्यांचा पगार 44 टक्क्यांपर्यंत वाढणार असा अंदाज आहे. कारण की, या मंडळीची एक प्रलंबित मागणी पुढील वर्षी पूर्ण होणार आहे.
कोणती मागणी होणार पूर्ण
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांची फिटमेंट फॅक्टर वाढीची मागणी पूर्ण होणार आहे. खरे तर गेल्या काही वर्षांपासून फिटमेंट फॅक्टर वाढीसाठी संबंधित नोकरदार मंडळीच्या माध्यमातून सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे.
आता मात्र पुढील वर्ष निवडणुकीचे वर्ष राहणार असल्याने ही प्रलंबित मागणी पूर्ण होऊ शकते असा अंदाज आहे. मीडिया रिपोर्ट नुसार, पुढील वर्षी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत तसेच काही राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका राहणार आहेत.
आपल्या राज्यात देखील विधानसभा निवडणुकांचा थरार रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी केंद्र शासनाकडून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. यामध्ये फिटमेंट फॅक्टर वाढवण्याचा देखील निर्णय घेतला जाईल अशी शक्यता आहे.
असे झाल्यास असेल सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात मोठी वाढ होणार आहे. सध्या फिटमेंट फॅक्टर 2.57 पट एवढा आहे. मात्र हा फिटमेंट फॅक्टर 3.68 पट केला जाणार आहे. जर सरकारने फिटमेंट फॅक्टर वाढवला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 8,860 रुपयांनी वाढ होणार आहे.
याचाच अर्थ सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात 8 हजारापेक्षा अधिकची वाढ होणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार 18000 एवढा आहे. पण यामध्ये 8000 वाढ होण्याची अपेक्षा आहे. यानुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार 26000 वर जाणार आहे.