मुंबई आणि पुण्यात 1 BHK फ्लॅटची किंमत किती ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai And Pune Flat Rate : आपल्यापैकी अनेकांचे नवीन घर घेण्याचे स्वप्न असेल. काही लोकांनी हे स्वप्न पूर्ण केले असेल तर काही लोक या स्वप्नासाठी आजही अहोरात्र काबाडकष्ट करत असतील. अलीकडे घरांच्या किमती देखील सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. यामुळे घराच्या स्वप्नांसाठी नागरिकांना अधिकची मेहनत घ्यावी लागत आहे. अनेकजण होम लोन घेऊन आपले स्वप्न पूर्ण करत आहेत. खरंतर घरांच्या किमती सर्वत्र सारख्याच वाढलेल्या पाहायला मिळतात.

पण काही भागात घरांच्या किमती ह्या तुलनेने जास्त वाढलेल्या आहेत. विशेषता मुंबई, पुण्यासारख्या शहरात घरांच्या किमती आकाशाला गवसणी घालत आहेत. या महानगरांमध्ये आता घर बनवणे म्हणजेच दिवसाढवळ्या स्वप्न पाहणे अशी गत होऊन बसली आहे. मात्र असे असले तरी एका आकडेवारीनुसार गेल्या एका वर्षाच्या काळात महागड्या घरांची विक्री सर्वात जास्त झाली आहे. तर दुसरीकडे मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या घरांच्या विक्रीमध्ये घट आली आहे.

आपल्या देशातील काही प्रमुख शहरांमध्ये एक कोटी किंवा त्यापेक्षा अधिक किंमत असलेल्या घरांची खपत ही जवळपास दुप्पट झाली आहे. तर दुसरीकडे चाळीस लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी किंमत असलेल्या घरांची खपत ही जवळपास 20 टक्क्यांनी कमी झाली आहे. अर्थातच आता मध्यमवर्गीयांना महानगरांमध्ये घर घेणे परवडत नाहीये. दरम्यान आता आपण मुंबई पुणे सारख्या देशातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये वन बीएचके फ्लॅट ची किंमत काय आहे आणि वन बीएचके घरासाठी या शहरांमध्ये काय भाडे घेतले जात आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईमधील अंधेरी भागात 500 चौरस फूट क्षेत्रात असलेल्या वन बीएचके घराची किंमत ही जवळपास एक कोटीच्या आसपास आहे तर वन बीएचके घर अंधेरी मध्ये साठ हजार रुपये प्रति महिना या दरात भाड्याने उपलब्ध होत आहे.

बंगळुरू मधील कोरमनगला या ठिकाणी 500 चौरस फूट क्षेत्रात असलेल्या वन बीएचके घराची किंमत ही जवळपास 75 लाखाच्या आसपास आहे. तर या शहरांमध्ये वन बीएचके घरासाठी 25 हजार रुपये प्रतिमहीना एवढे भाडे आकारले जात आहे.

कोलकत्ता न्यू टाऊन या भागात 600 चौरस फूट क्षेत्रात असलेल्या वन बीएचके घराची किंमत चाळीस लाखांच्या आसपास आहे. दुसरीकडे या भागात वन बीएचके फ्लॅटसाठी पंधरा हजार रुपये प्रति महिना एवढे भाडे आकारले जात आहे.

नवी दिल्ली येथील वसंत कुंज भागात 650 चौरस फूट क्षेत्रात असलेल्या वन बीएचके घराची किंमत 70 लाखाच्या आसपास आहे. तसेच याच वन बीएचके घरांसाठी जवळपास 20 हजार रुपये प्रति महिना एवढे भाडे घेतले जात आहे.

पुणे, हिंजवडी येथे 450 चौरस फूट क्षेत्रात असलेल्या वन बीएचके घराची किंमत 40 लाखाच्या आसपास आहे. तसेच येथे याच घरांसाठी 15000 प्रति महिना एवढे भाडे आकारले जात आहे.

हैदराबाद बेगम पेठ या भागात 550 चौरस फूट क्षेत्रात वसलेल्या वन बीएचके घराची किंमत तीस लाखाच्या आसपास आहे. तर या भागात याच घरांसाठी 9000 रुपये प्रति महिना एवढे घर भाडे घेतले जात आहे.

चेन्नई, अण्णा नगर या भागात 500 चौरस फूट घरांची किंमत 40 लाख रुपये आहे. तर एवढच क्षेत्रफळ असलेल्या वन बीएचके घरांसाठी पंधरा हजार रुपये एवढे घर भाडे आकारले जात आहे.

Leave a Comment